शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

खिंडार पाडण्याची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटलांचं कर्तुत्व काय? : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 15:42 IST

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं व त्यांच्या पक्षाचं कर्तुत्व काय?, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी मंत्री पाटील यांच्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला. सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

ठळक मुद्देखिंडार पाडण्याची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटलांचं कर्तुत्व काय?  : शरद पवारस्वत:चं झाकायचं अन दुसºयाचं दाखवा म्हणायचं, यात कसला शहाणपणा

सातारा : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं व त्यांच्या पक्षाचं कर्तुत्व काय?, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी मंत्री पाटील यांच्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला. सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हिंमत असेल तर दोन्ही काँगे्रसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवून दाखवावे, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणार, असे आव्हान दिले होते.

याबाबत छेडले असता, खा. पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील ज्या राजकीय पक्षात आहेत, त्या पक्षाने देशपातळीपासून राज्यामध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवली का कधी? त्यांचे संपूर्ण नियोजन कधी शिवसेना कधी रिपब्लिकनपक्षाचे रामदास ठाकरे, यांच्या मदतीने होते.

स्वत:चं झाकून ठेवायचे आणि दुसऱ्यांचं दाखवा म्हणून सांगायचं हे शहाणपणाचे लक्षण नाही. त्यांना बोलायचा फारसा अधिकारच नाही. त्यांनी काही स्वतंत्र कर्तुत्व दाखवलं का? चार वर्षांत राज्याच्या हिताचं काय काम करावं, ते सांगावं. देशात व राज्यात अनेक प्रश्न आहेत, त्यांच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयांवर त्यांनी बोलावं.राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणार, असे मंत्री पाटील म्हणाले होते, याबाबत खा. पवार म्हणाले, त्यांनी खिंडार पाडण्याचा उद्योग कधी सुरु केला हे मला माहित नाही. लोकसभेच्या निवडणुकीबाबत फसवाफसवी होऊ नये, अशी मागणी केल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती, याबाबतविचारले असता खा. पवार म्हणाले, ते तुमच्याशी बोलले, माझ्याशी असं काही बोलले नाही. ते पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी मला वेळ मागितली होती. त्यानुसार ते भेटायला आले होते. माझ्यापर्यंत तो प्रश्न नाही.लोकसभेसाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव पुढे येत आहे, याबाबत विचारले असता. खा. पवार म्हणाले, मी तर कुणाशी चर्चा केलेली नाही. पक्षाची बैठकही घेतलेली नाही. पक्षाच्या आमदारांनी कुणाचं नाव सुचविलं आहे का? या प्रश्नावर खा. पवार म्हणाले, पक्षामध्ये काही समज-गैरसमज असतात. ते आजच नाही तर दहावर्षांपासून त्याचा मी अनुभव घेत आहे. पण आमचं काम स्मूथली यशस्वीरित्या होत नाही.अजून आम्ही तव्यापर्यंत गेलोच नाहीलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाकरी करपलीय का? या प्रश्नावर बोलताना खा. पवार म्हणाले, आम्ही अजून तव्यापर्यंत गेलेलोच नाही. पक्षाची बैठक झाल्यानंतर याबाबत जो काय व्हायचा तो निर्णय होईल.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSatara areaसातारा परिसरPoliticsराजकारण