शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

उरमोडीचं खळाळलं जिहे-कटापूरचं काय?

By admin | Updated: September 10, 2016 00:39 IST

पाणीप्रश्नावर निवडणुका लढणारे नेतेही चिडीचूप : सांगा योजना कधी लागणार मार्गी? माण-खटाव वासीयांचा सवाल

दहिवडी : माण तालुक्यामध्ये उरमोडी योजनेचे पाणी आले असून, श्रेयवादावरून राजकारण चांगलेच रंगू लागले आहे, असे असताना दुसरीकडे मात्र तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जिहे-कटापूर योजनेबद्दल मात्र कोणीही बोलायला तयार नाही. या योजनेमुळे माण-खटावमधील ७० टक्के भाग सिंचनाखाली येणार आहे. असे असताना केवळ श्रेयवादाच्या राजकारणात या योजनेकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही.राज्यातील दुष्काळी तालुक्याचा पाणी प्रश्न निकाली काढावा यासाठी सर्व प्रथम १९९५ मध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ठोस धोरण आखले. त्यातून पश्चिम महाराष्ट्रासाठी कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली. त्यामध्ये वसना, वांगना, जाणाई, शिरसाई, टेंभू योजनेसह माण-खटावला वरदान ठरणाऱ्या जिहे-कटापूर व उरमोडी योजनेचा समावेश केला गेला. दिवंगत अभयसिंहराजे भोसले, उदयनराजे भोसले, हिंदुराव नाईक-निंबाळकर, रामराजे नाईक-निंबाळकर, भाऊसाहेब गुदगे, सदाशिवराव पोळ यांनी पहिल्या टप्प्यात या योजना गतिमान केल्या. यासाठी प्रसंगी कर्जरोखे काढले गेले. त्यामुळे या योजनेला गती आली. त्यानंतर युतीचे शासन गेले, आघाडीचे आले. अनेक निवडणुका या पाण्यावर होऊ लागल्या. खटावमध्ये डॉ. दिलीपराव येळगावकर, आमदार जयकुमार गोरे हे या आंदोलनात यशस्वी झाले. त्यांनी पाणी हाच माण-खटावचा श्वास असल्याने यावर लक्ष केंद्रित केले व निवडणुकाही जिंकल्या. आज उरमोडीचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण धावतात; पण ‘ज्याच्या हातात ससा तो पारधी’ या म्हणीप्रमाणे सत्ताधारी जरी या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी सर्वांचेच श्रेय या योजनेसाठी आहे हे नाकारून चालणार नाही. मग हिंदुराव नाईक-निंबाळकर, डॉ. दिलीप येळगावकर, रणजितसिंह देशमुख, सुरेंद्र गुदगे यांची आंदोलने असोत किंवा आमदार गोरे, रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे यांचे शासकीय पातळीवर केलेले योगदान असो किंवा वाघोजीराव पोळ, विश्वंबर बाबर, अजितराव राजेमाने, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, डॉ. महादेव कापसे यांच्या पाणी परीक्षा असो प्रत्येकाने या पाण्यासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे हे श्रेय सर्वांचेच आहे. हेही नाकारून चालणार नाही. आज उरमोडीचे पाणी माण-खटावला पोहोचले आहे. यावर अनेकजण आता श्रेयवादावरून राजकारण करू लागले आहेत. मात्र, कसे का असेना माणला पाणी आले.उरमोडीचे पाणी आले परंतु जिहे-कटापूरवर एक ही शब्द निघत नाही. अधूनमधून सहा महिन्यांत पाणी येणार? तीन महिन्यांत पाणी येणार हे निवडणुकीपुरते दिलेले आश्वासन गेली १० वर्षे जनता ऐकत आहे. उरमोडी योजना झाली. चांगली गोष्ट आहे; पण माण-खटावला ज्या योजनेसाठी खरी गरज आहे ती जिहे-कटापूरच योजना आहे. आज ही योजना पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यावर कोणत्याच नेत्यांनी म्हणावे तितके प्रयत्न केले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्पासाठी निधी दिला. त्यावेळी श्रेयवाद घेणाऱ्या मंडळींनी या योजनेत जिहे-कटापूरचा समावेश व्हावा यासाठी किती प्रयत्न केले हे ही जनतेसमोर आले पाहिजे. असे उरमोडीचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ झाली तशी जिहे-कटापूरसाठी झाली तरी चालेल; पण ही योजना पहिली पूर्ण करा, अशी जनतेची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)...तर हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखालीजाणाई-शिरसाई, जिहे-कटापूर या योजनेचे एकाच दिवशी नारळ फुटले असताना जिहे-कटापूर योजना अपुरीच कशी? उरमोडीमुळे तालुक्याचे २० टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते. परंतु जिहे-कटापूर योजना झाल्यास माण-खटावमधील ७० टक्के भाग सिंचनाखाली येणार आहे. खटावमध्ये नेर तलावात माणमध्ये आंधळी तलावात पाणी सुटणार आहे. आंधळीची पातळी ०.२६२ अब्ज घनफूट आहे. या एकट्या तालुक्यामुळे ४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या दोन्ही तलाव्यात पाणी आल्यास कोणत्याही गावाला पाणी देणे शक्य होणार आहे, असे असताना जिहे-कटापूर योजनेवर भर देणे गरजेचे आहे. जिहे-कटापूर व उरमोडी योजना ही युती शासनाची कल्पना असून, कोणी काहीही म्हणजे युती शासनाने सुरू केलेली योजना युती शासनाच्या काळातच पूर्ण होईल. त्यासाठी पालकमंत्रीही आग्रही असून, जिहे-कटापूरचे पाणी लवकरच माणमध्ये येईल.- अनिल सुभेदार, जिल्हा शिवसेना उपप्रमुख