शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गावाकडच्या चटणीचा काय वर्णावा थाट! महानगरांमधून वाढतेय मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:43 IST

सातारा : महानगरांमध्ये वाढत जाणारे सिमेंटचे जंगल आणि लुप्त झालेले अंगण यामुळे उन्हाळी कामांसाठी तेथील महिलांना साताऱ्याचा आसरा घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्दे मिरची पावडर तयार करून शहरांकडे नेण्याकडे दिसतोय कल

सातारा : महानगरांमध्ये वाढत जाणारे सिमेंटचे जंगल आणि लुप्त झालेले अंगण यामुळे उन्हाळी कामांसाठी तेथील महिलांना साताऱ्याचा आसरा घ्यावा लागत आहे. शहरात उपलब्ध होणाºया वस्तू आणि अपार्टमेंटमध्येही जिवंत असलेली माणुसकी यामुळे साताºयाच्या अंगणात सध्या मुंबईकरांच्या मसाल्याचं वाळवणं पडलेलं दिसत आहे.नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्तानं आपलं गाव सोडून मोठ्या शहरात वसलेल्या कुटुंबाला वर्षभराची चटणी, पापड, कुरडई, सांडगे आदी करण्यासाठी साताºयाकडे किंवा त्यांच्या गावाकडे जावे लागते.एप्रिल महिन्यात मुलांची परीक्षा संपल्यानंतर सर्वत्रच मिरची आणणे निवडणे, भाजणे, मसाला तळणे आणि मिरची कांडून आणण्याची धांदल सुरू असते.मोठ्या शहरांत घरे जवळ जवळ असल्यामुळे पदार्थ करणं आणि वाळत घालणं यासाठी जागा नसल्यामुळे अडचण होत आहे.'दरांमध्ये तिपटीने फरकसाताºयात गुंटूर १२०-१२५, ब्याडगी १८०-२०० व लवंगी मिरची १३० ते १३५ रुपये किलो या दराने विक्री होत आहे. एक किलो मिरचीसाठी साधारण १५० ते २५० रुपयांचा मसाला लागतो. मिरची कांडण्यासाठी १५ पंधरा रुपये घेतात. महानगरांमध्ये मिरची आणि मसाला या दोन्हीबरोबरच कांडण्याचे दरही तिप्पट आहेत. चार जणांच्या कुटुंबाला तीन किलो चटणी वर्षाला पुरून उरते. जागेच्या अडचणीबरोबरच दरांच्या आकड्यांची बेरीज केली तर साताºयात किंवा गावात येऊन मिरची पावडर तयार करून नेणं परवडत असल्याचे मुंबईस्थित गृहिणी मंदाकिनी काळभोर यांनी सांगितले.वेफर्स अन् कुरवड्याहीमहानगरांमध्ये राहणाºया महिला साताºयातून मिरची पावडरबरोरबच वेफर्स, पापड, सांडगे, कुरडई, सालपापड्या, उपवासाचे पापड आदी वर्षभराचे तळण प्रकार येथूनच करून मुंबईला घेऊन जातात.वर्षाचे धान्य देण्याकडेही कलमुंबई-पुण्यात टेरेसही रिकामे नसल्याचे चित्र दिसते. त्यामुळे शेतातील धान्य उन्हाळी आणि दिवाळी सुटीत घेऊन जाण्याकडे कल आहे. येथे कडक उन्हात वाळवलेले धान्य वर्षभर तेथे खराब होत नाही.पुण्या-मुंबईकडून गावाकडे आलेल्यांची चटणी करण्याची धांदल जाणवते. दिवसाकाठी पन्नास ते साठ किलो लाल मिरचीची विक्री होते. मोठ्या शहरांच्या तुलनेत साताºयात मसाल्याचे दरही चाळीस टक्क्यांनी कमी आहेत.- अशोक माने,मिरची विक्रेता