शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

श्री घाटाई तीर्थक्षेत्र परिसरात रंगताहेत ओल्या पाट्‌र्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 13:17 IST

kas pathar sataranews- कास पठारच्या कुशीत घनदाट वनराईत स्वयंभू लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीघाटाई देवीचे मंदिर आहे. मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. मंदिर परिसरात ओल्या पाट्‌र्या झडत असल्याने तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात येऊ लागले आहे. परिसरात सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच तसेच चुली पेटल्याचे चित्र दिसत असल्याने भाविकांसह स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देश्री घाटाई तीर्थक्षेत्र परिसरात रंगताहेत ओल्या पाट्‌र्या भाविकांमध्ये संताप : संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

पेट्री : कास पठारच्या कुशीत घनदाट वनराईत स्वयंभू लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीघाटाई देवीचे मंदिर आहे. मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. मंदिर परिसरात ओल्या पाट्‌र्या झडत असल्याने तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात येऊ लागले आहे. परिसरात सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच तसेच चुली पेटल्याचे चित्र दिसत असल्याने भाविकांसह स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.परळी खोऱ्यातील डोंगरमाथ्यावर निसर्गसौंदर्याने नटलेल्या वनराईत श्री घाटाई देवीचे मंदिर आहे. दरवर्षी यात्रेला लाखो भाविकांसह इतर दिवशीही अनेक भाविक दर्शनासाठी तसेच पर्यटकही या ठिकाणी भेट देतात. या देवीचा महिमा सर्वदूर पोहोचला आहे. भक्तांच्या देणगीतून देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून देवीच्या मंदिराचा जीर्णोध्दार झाला आहे. अन्य सुशोभिकरणाचे काम सुरू आहे.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून याठिकाणी भक्तनिवास मंजूर झाले आहे. घाटाई रस्त्याचेही डांबरीकरण पूर्ण झाले आहे.

खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत. मंदिराला तीर्थक्षेत्रस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. देवीच्या नावे पूर्वीपासून शेकडो एकर जमीन आहे. हा परिसर निसर्गसंपदेने नटला आहे. मोठमोठ्या झाडांनी संपूर्ण परिसर वेढला आहे. पशु-पक्ष्यांचाही वावर मोठ्या प्रमाणात आहे.एखाद्या देखाव्यातील सुशोभिकरणापेक्षाही हा मंदिर परिसर सजला आहे. मात्र एकीकडे तीर्थस्थळाचा विकास होत असताना दुसरीकडे मंदिर परिसरातील देवीच्या वनराईत चुली पेटवून ओल्या पाट्‌र्याना ऊत आला आहे. सुटीच्या दिवशी काही हुल्लडबाज या तीर्थस्थळाच्या ठिकाणी ओपन बार भरवत असल्याचे चित्र दिसत आहे.अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच, पेटवलेल्या चुली, प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या तीर्थस्थळाचे महत्त्व व अनमोल निसर्ग टिकवून ठेवण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलून बेशिस्त व विघातक कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविक, स्थानिकांतून होत आहे. 

टॅग्स :Kas Patharकास पठारSatara areaसातारा परिसर