आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २२ : श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी आणि महिनाभर मांसाहार वर्ज्य करण्याची भिष्म प्रतिज्ञा घेणाऱ्या आरंभशुरांनी यंदा घरगुती गटारी साजरी करण्यास पसंती दिली आहे. रविवारी सुट्टी लक्षात घेवून घराघरांमध्ये सध्या आखाड तळणं आणि गटारी अमावस्येची तयारी जोरदारपणे सुरू आहे.शहरातील विविध हॉटेल्समध्ये सध्या गटारी उत्सवास प्रारंभ झाला आहे. विविध आॅफर्स आणि डिस्काऊंट देवून ग्राहकांना आकर्षित करण्याचे फंडे हॉटेल व्यावसायिक वापरत आहेत. मात्र, बाहेरील अन्न खाण्यापेक्षा घरातच शिजवून सहकुटूंब गटारीचा आस्वाद घेण्याकडे नागरिकांचा कल यंदा जास्त आहे. त्यातच यंदा रविवारी गटारी अमावस्या आल्यामुळे अनेकांनी घरातच गटारी साजरा करण्याचा संकल्प केला आहे.
रविवारमुळे यंदाची गटारी घरातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:27 IST