शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे - दमयंतीराजे भोसले 

By सचिन काकडे | Updated: February 19, 2024 19:18 IST

शिवजयंती निमित्त संग्रहालयात शस्त्र प्रदर्शन

सातारा : ‘युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. साताऱ्यात त्यांच्या नावाने उभे राहत असलेले संग्रहालय शहराच्या वैभवात निश्चितच भर घालेल. या संग्रहालयाचे काम गतीने सुरू असल्याचे पाहून मनस्वी आनंद होत आहे,’ असे उद्गार 'नक्षत्र'च्या अध्यक्षा दमयंतीराजे भोसले यांनी काढले.महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात सोमवारी शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले. शिवप्रतिमेचे पूजन व शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, इतिहास अभ्यासक व मोडी लीपीतज्ज्ञ घनश्याम ढाणे, संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे, जिज्ञासा मंचचे निलेश पंडित, गणेश शिंदे, महारुद्र तिकुंडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. डॉ. तेजस गर्गे यांनी ‘मराठा लष्करी स्थापत्य जागतिक वारसा नामांकन व शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर घनश्यम ढाणे यांनी कवी कलश यांच्या कार्याचा आढावा घेतला. साताऱ्याचे तख्त तसेच अन्य शिवकालीन वस्तुंची दमयंतीराजे यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी संग्रहालयाच्या कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

इतिहासप्रेमी सातारकरांचा प्रतिसादसाताऱ्यातील संग्रहालयात साताऱ्याची गादी (तख्त), मिनियर पेंटिंग, तलवारी, भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राने, चिलखत, तोफगोळे, अंकुश, परशू, गुप्ती, धनुष्यबाण, रणशिंग, जेडची मठ, बिचवा, वाघ नखे, बंदुकांचे प्रकार, संगिनी, अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, कातील बख्तर, बाहू, आच्छादने, तुमान, विविध प्रकारच्या पगड्या, शेला अशा अनेक ऐतिहासिक व शिवकालीन वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. यापैकी ठराविक वस्तू सातारकरांना पाहण्यासाठी प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. प्रदर्शन पाहण्यासाठी इतिहासप्रेमी सातारकरांची संग्रहालयात दिवसभर रेलचेल सुरू होती. शिवकालीन शस्त्रे जवळून पाहतानाच अनेकांनी त्यांचा इतिहास देखील अनुभवला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivjayantiशिवजयंती