शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अपप्रवृत्तीला मदत करणाऱ्यांना सहा महिन्यात जागा दाखवू, शरद पवारांचा इशारा 

By दीपक शिंदे | Updated: July 3, 2023 14:08 IST

राज्याला विकासात पुढे घेऊन जाण्यासाठी युवा शक्तीची गरज

दीपक शिंदेकऱ्हाड : देशातील सर्वसामान्य माणसाचा लोकशाहीचा अधिकार काढून घेणे आणि जातीय दंगली घडविण्याचे काम सुरू आहे. राज्यात देखील अशाच प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे. त्यांना पुढील सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. तसेच महाराष्ट्राला पुन्हा प्रगती कडे घेऊन जाण्यासाठी आता नवीन पिढी तयार करणे आवश्यक असून त्याला युवाशक्तीचा हातभार लागणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.  कऱ्हाड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून त्यांनी पक्षाची नवी भूमिका स्पष्ट केली. त्याबरोबरच आगामी कालावधीमध्ये कोणत्या पद्धतीने पुढे जाणे आवश्यक आहे याबाबतही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, प्रभाकर देशमुख, मानसिंगराव देशमुख, अरुण लाड, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार, रोहित पाटील आणि प्रतीक पाटील उपस्थित होते.शरद पवार म्हणाले,  जात, धर्म आणि पंथ या माध्यमातून माणसांमध्ये संघर्ष कसा वाढत जाईल, यासाठी प्रयत्न करणारा एक वर्ग तयार होतो आहे. शाहूंचे कोल्हापूर असेल नांदेड, सांगोला, अकोला या ठिकाणी लोकांमध्ये वैरभावना निर्माण करून ती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातूनच जातीय दंगे झाले. समाजविघातक प्रवृत्ती या उभ्या  राहत असताना त्यांना रोखण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस हे काम करत आहे. मात्र त्यालाही अडथळा आणण्याचा प्रयत्न या शक्तीकडून होत आहे.शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून सरकार एकत्रितपणे चालवण्याचं काम केलं. मात्र हे सरकार देखील पाडून टाकण्याचं काम या विघातक शक्तीने केले. देशात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली असून मध्य प्रदेश मध्ये कमलनाथ यांचे सरकार देखील अशाच पद्धतीने पाडण्यात आले.  देशात दिल्ली, पंजाब, उत्तराखंड या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती निर्माण केली जात आहे. सध्या संकटाचा काळ आहे, पण यातूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. या प्रवृत्तीला थांबविले पाहिजे.हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांचा आहे. लोकशाहीत काम करणाऱ्या कामगारांचा आहे. या ठिकाणी जातीयवादी विचारधारा कधीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होणार नाही. यासाठी ही नवीन पिढी जातीयवाद्यांना गाडण्याचे काम करेल. दुर्दैवाने आपले काही सहकारी या जातीवादांसोबत जात आहेत. मात्र, लवकरच त्यांना त्यांची जागा देखील कळेल. यासाठी सर्व सामाजिक शक्ती मजबूत करून आपण लढा उभारला पाहिजे. सर्वांच्या हिताचे कष्टकऱ्यांचे आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे राज्य निर्माण करण्याचे काम पुढच्या काळामध्ये होणं आवश्यक असल्याचेही  पवार म्हणाले.

आता फक्त माझाच आवाज..प्रीतीसंगमावरती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी शरद पवारांनी सर्वांना शांत करत, शांत बसा, कोणी बोलू नका. आता फक्त माझाच आवाज असे बोलल्याने सर्वत्र शांतता पसरली. मात्र त्यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे हे देखील सर्वांना कळले.

 तुमच्याकडे बेंदूर आमच्याकडे गुरुपौर्णिमा यशवंतराव चव्हाण हे तुमचे आमचे सर्वांचे गुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जनमत तयार करण्याचे काम पुढच्या काळात करायचे आहे. ते त्यांचा आशीर्वाद घेऊनच करणार आहोत. यासाठी त्यांना वंदन करून महाराष्ट्राच्या नवीन कामाला सुरुवात करत असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले. तुमच्याकडे बेंदूर असला तरी आमची गुरुपौर्णिमा आहे असे सांगत त्यांनी उपस्थिताना नव्या महाराष्ट्राच्या जडणघडणी बाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवार