वडूज : जलसंधारणाच्या कार्यात सर्वश्रेष्ठ योगदान कोणतं तर श्रमदान. जे स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन गावाच्या पर्यायाने समाजासाठी नि:शुल्क तन-मन हरवून आत्मियतेने कार्य करतात, त्याला श्रमदान म्हणतात. याची खरी प्रचिती निमसोड गावात गेल्यानंतरच समजते.निमसोडमध्ये वैयक्तिक कामे बाजूला ठेवून गावं पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. जसजशी स्पर्धा पुढे सरकत आहे, तसे प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच ऊर्जा मिळत आहे, त्यामुळे नव्याने श्रमदानास येणाºया लोकांच्यात वाढ होत आहे. आता तर उन्हाळी सुट्या लागल्यामुळे जे निमसोडमधील लोक नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेर गावी आहेत, त्यांचीही श्रमदानास उपस्थिती वाढू लागली आहे. त्याचबरोबर बालगोपाळ ही सुटीचा आनंद श्रमदानातून घेताना आढळून येत आहेत. एकूणच काय तर आता निमसोडमधील प्रत्येकाचे मन म्हणू लागलंय की आम्हीसुद्धा जमेल तसे श्रमदान करून या घटनेचे साक्षीदार होऊ, असा निर्धार निमसोडकरांनी केला आहे.खटाव तालुक्यामध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या व कायम चर्चेत असलेल्या निमसोड गावाने सर्व राजकीय हेवेदावे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून वॉटर कपमधील कामांसाठी व संपूर्ण गाव पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे.पाण्यासाठी राजकीय मतभेद बाजूलानिमसोडकरांनी दररोज गावात व वाडीवस्तीवर बैठकांना जोर लावला असून कदमवाडी, शेळकेवाडी, बडेखानमळा, बुगडीचा मळा, पूर्व व पश्चिम घाडगे मळा, कुरण मळा, महादेव मळा, मधला मळा, शितोळेवाडी येथे ग्रामस्थ बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने निमसोडात राजकीय मतभेद विसरल्याने पाण्यासाठी तुफान आलंया, असेच म्हणावे लागेल.
निमसोडच्या जलक्रांतीचे आम्ही होणार साक्षीदार--चला गाव बदलूया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:47 IST
वडूज : जलसंधारणाच्या कार्यात सर्वश्रेष्ठ योगदान कोणतं तर श्रमदान. जे स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन गावाच्या पर्यायाने समाजासाठी नि:शुल्क तन-मन हरवून आत्मियतेने कार्य करतात, त्याला श्रमदान म्हणतात. याची खरी प्रचिती निमसोड गावात गेल्यानंतरच समजते.निमसोडमध्ये वैयक्तिक कामे बाजूला ठेवून गावं पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. जसजशी स्पर्धा पुढे सरकत आहे, तसे प्रत्येकाच्या मनात ...
निमसोडच्या जलक्रांतीचे आम्ही होणार साक्षीदार--चला गाव बदलूया
ठळक मुद्देगावकऱ्यांचा निर्धार; जलसंधारणाच्या कार्यात सर्वश्रेष्ठ योगदान म्हणजे श्रमदान