वडगाव हवेली, दुशेरे येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त सभासद संपर्क दौऱ्यादरम्यान वडगाव हवेली येथील आयोजित बैठकीत डाॅ. मोहिते बोलत होते. या वेळी माजी संचालक रघुनाथ कदम, उमेदवार डॉ. सुधीर जगताप, विलास पाटील येरवळेकर, माजी उपसरपंच जयवंत जगताप, आनंदराव जगताप, रामभाऊ जगताप, प्रमोद पाटील, नितीन पाटील, सयाजी पाटील, अधिकराव भंडारे, रामचंद्र जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मोहिते म्हणाले, रयत संघर्ष मंचने आजपर्यंत सभासद हा कारखान्याचा केंद्रबिंदू मानून काम केले आहे. कारखान्याच्या मार्फत शेतकरी सभासदांसाठी अनेकविध योजना राबवून त्यांचे हित जोपासले आहे हे सुज्ञ सभासदांना ज्ञात आहे. मनोमीलनासाठी आम्ही आशावादी असल्याचे सांगून मनोमिलनाबाबत सकारात्मक संकेत त्यांनी व्यक्त केले. या वेळी डॉ. सुधीर जगताप, आनंदराव जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. माजी उपसरपंच जयवंत जगताप यांनी आभार मानले.