शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

मद्यधुंद कारचालकाने नऊजणांना ठोकरले; गोंदवलेत डंपर आडवा लावून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 9:31 AM

चालक हणमंत गेजगे यालाही गाडीतून बाहेर काढून लोकांनी चांगलाच चोप दिला. याचवेळी या थरारक वाहनाचा पाठलाग करणारे पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लोकांनी चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्दे पंढरपूरहून साताऱ्याकडे जाताना प्रकार : चौघेजण गंभीर,

म्हसवड : पंढरपूरहून साता-याकडे जाताना मंगळवारी रात्री मद्यपी वाहनचालकाने पिलीव ते गोंदवलेदरम्यानच्या अंतरात ८ ते ९ जणांना ठोकरले. त्यातील चौघेजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मद्यधुंद चालकाचा म्हसवड पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर गोंदवलेत मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने डंपर अडवा लावून त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, दि. १९ रोजी रात्री आठच्या सुमारास गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील मुख्य रस्त्यावर सामसूम होत चालली असतानाच मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह भास्कर कट्टे यांच्याशी म्हसवडच्या शेखर वीरकर यांनी संपर्क साधला. एक चारचाकी रस्त्याने वाहनांना ठोकरत येत असल्याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर गोंदवले ग्रामस्थांनाही ही माहिती समजताच वेगाने अपघात करत निघालेल्या वाहनाला अडविण्यासाठी धावपळ सुरू झाली. अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण रस्ता रिकामा करण्यात आला.

अपघाताला कारणीभूत ठरणारे वाहन थांबविण्यासाठी सातारा-पंढरपूर या मुख्य रस्त्यावरच धैर्यशील पाटील यांनी स्वत:चा डंपर आडवा उभा केला. काही मिनिटांतच (एमएच ११ सीजी ३६६०) ही पांढºया रंगाची चारचाकी वेगाने येताना दिसली. त्याचक्षणी तातडीने ही गाडी थांबविण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली. रस्त्यावरच डंपर आडवा लावल्यामुळे चालकाला गाडी थांबविण्याशिवाय पर्यायच नव्हता. चालक हणमंत तात्यासो गेजगे (वय ३५, रा. कारखेल, ता. माण) याने गाडी थांबविताच लोकांनी गराडा घातला. परंतु गाडीची दारे व काचा बंद होत्या. त्यातच वाहन सुरूच असल्याने धोका अधिकच वाढला होता. मात्र, याचवेळी धाडसाने धैर्यशील पाटील यांनी वाहनावर उभे राहून चालकाला गाडी बंद करण्यास सांगितले. तरीही चालक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर काचा फोडून गाडी बंद करण्यात आली.

चालक हणमंत गेजगे यालाही गाडीतून बाहेर काढून लोकांनी चांगलाच चोप दिला. याचवेळी या थरारक वाहनाचा पाठलाग करणारे पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लोकांनी चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघात करत आलेल्या वाहनाचा म्हसवडमधूनच बंटी माने व त्यांच्या सहकाऱ्यांनीही पाठलाग सुरू केला होता. मात्र, गोंदवल्यात हे वाहन थांबविल्यानंतर त्यांचाही पाठलाग थांबला.

दरम्यान, या वाहनाने वीरकरवाडी (ता. माण) येथील दोघांना पिलीव घाट परिसरात उडवून गंभीर जखमी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असली तरी संपूर्ण प्रवासादरम्यान आणखी कितीजणांना अपघातग्रस्त केले? याबाबत मात्र सविस्तर माहिती मिळालेली नव्हती.

म्हसवड पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन व चालकाला ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे हे अधिक तपास करीत आहेत. या थरारक पाठलागात म्हसवड पोलीस ठाण्याचे किरण चव्हाण, सूरज काकडे, संजय अस्वले, अनिल वाघमोडे, कुंभार सहभागी झाली होते.सोलापूर जिल्ह्यातील उपरी (ता. पंढरपूर) पासून सुरू झालेली अपघाताची मालिका गोंदवल्यातील सतर्क नागरिकांमुळे संपली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला व पोलिसांसह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. परिणामी मोठा अनर्थ टळला. या थरारात चालक हणमंत गेजगे याने दोनजणांना ठोकरल्याची माहिती मिळत असली तरी या भरधाव प्रवासात ८ ते ९ जणांना ठोकरले असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर