शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वाठार, लोणंद परिसरात घरफोडी करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 19:49 IST

लोणंद आणि वाठार परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून घरफोडीतील सहा मोबाइल व दुचाकी असा ८१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देवाठार, लोणंद परिसरात घरफोडी करणारा अटकेतस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा : लोणंद आणि वाठार परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून घरफोडीतील सहा मोबाइल व दुचाकी असा ८१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.उमेश पुरंदर काळे (रा. भादे, ता. खंडाळा)असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. काळे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर वाठार, लोणंद परिसरात घरफोडी केल्याचे बरेच गुन्हे दाखल आहेत. त्याने सोळशीत, निरा रोडवरील एका बारमध्ये, लोणंद, पिपोंडे येथील देशी दारूच्या दुकानात चोरी केली होती.

दि. १७ रोजी वीर धरणाच्या भिंतीजवळ भादे गावाकडे जाणाऱ्या रोडवर चोरलेले मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

साबळे यांनी परिसरात सापळा लावला असता त्याठिकाणी उमेश काळे हा दुचाकीवरून तेथे आला. पोलिसांना संशय आल्याने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तीन मित्रांसमवेत त्याने विविध ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे मोबाइल व दुचाकी असा ८१ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपासासाठी वाठार पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्प पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार विलास नागे, जोतीराम बर्गे, हवालदार मोहन नाचण, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, संजय जाधव, धीरज महाडिक, वैभव सावंत, विजय सावंत यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर