शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

पाणीच पाणी चोहीकडे; गेला रस्ता कुणीकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:13 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड/ओगलेवाडी : चौपदरीकरणा अंतर्गत चकाचक झालेल्या आणि सर्वत्र औत्सुक्याचा विषय बनलेल्या कºहाड-ओगलेवाडी या रस्त्याला बुधवारी डबक्याचे स्वरूप आले. परतीच्या पावसाने मंगळवारी रात्री झोडपून काढल्यानंतर पहाटेपासून या रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाली. पाणी वाहून जाणारे मार्ग बंद झाल्याने या रस्त्यावरून गुडघाभर पाणी वाहत होते. त्यामुळे हा रस्ता ओढा आहे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड/ओगलेवाडी : चौपदरीकरणा अंतर्गत चकाचक झालेल्या आणि सर्वत्र औत्सुक्याचा विषय बनलेल्या कºहाड-ओगलेवाडी या रस्त्याला बुधवारी डबक्याचे स्वरूप आले. परतीच्या पावसाने मंगळवारी रात्री झोडपून काढल्यानंतर पहाटेपासून या रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाली. पाणी वाहून जाणारे मार्ग बंद झाल्याने या रस्त्यावरून गुडघाभर पाणी वाहत होते. त्यामुळे हा रस्ता ओढा आहे की तळे?, असा प्रश्न प्रवाशांना पडत होता.दरम्यान, रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या अण्णा नांगरे कॉलनीतही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. हे पाणी बुधवारी पहाटे परिसरातील वीसपेक्षा जास्त घरांमध्ये घुसल्याने मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.कºहाड-ओगलेवाडी या रस्त्याचे चौपदरीकरण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने झाले आहे. या रस्त्याचे सर्व काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यामुळे या परिसरातील वाहतुकीची समस्या निकाली निघाली आहे. मात्र, हा रस्ता करताना नैसर्गिकरित्या पाणी वाहून नेणारे नाले मुजविण्यात आले. काही ठिकाणी पाईप टाकण्यात आल्या. मात्र, परिसरातील जमा होणारे पाणी आणि या पाईपची संख्या तसेच त्यांचा आकार समर्पक नसल्याचे दिसून येत आहे. पाणी प्रचंड प्रमाणात साठते तर पाणी वाहून जाण्यासाठीची सोय खूपच अपुरी पडते. हे पाणी साठत जाऊन शेवटी पादचारी मार्गावरून रस्त्यावर उतरते. या पाण्यामुळे हा संपूर्ण रस्ता जलमय होतो. यातून मार्ग काढताना नागरिकांचे खूप हाल होतात. तर या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहनधारकांचे साहित्य भिजून अनेकांना नुकसान सहन करावे लागते. परिसरातील व्यावसायिक लोकांनाही याचा फटका सहन करावा लागतो.कॅनॉल चौक ते सूर्या हॉटेलपासून होली फॅमिली शाळेपर्यंत पूर्वी सर्व शेत जमिनीचा भाग होता. मात्र, काळाच्या ओघात या सर्व परिसरांत अनेक बांधकामे झाली आहेत. येथील शेतात पूर्वीही खूप पाणी साठत होते. मात्र, ओढे, नाले आणि नैसर्गिक उताराने त्याचा पूर्ण निचरा होत होता. चौपदरीकरणाचे काम करताना असे पाणी वाहून जाणारे अनेक मार्ग बंद करण्यात आले. अनेक ठिकाणी क्षमता विचारात न घेता कमी व्यासाच्या पाईप टाकण्यात आल्या. गटारांची उंची आसपासच्या शेत जमिनीपेक्षा जास्त ठेवण्यात आली. त्यामुळे गटार पाणी वाहून नेण्यापेक्षा पाणी अडविण्याचे काम करत असल्याचे दिसते. परिणामी साठलेले पाणी जागा मिळेल तेथून रस्त्यावर येते आणि साठून राहते. परिसराला मंगळवारी रात्रीही पावसाने झोडपले. त्यानंतर काही वेळांतच हा रस्ता जलमय झाला. नजीकच्या अण्णा नांगरे कॉलनीतील घरांमध्येही पाणी गेले. नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. पाणी घरातून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांना रात्रभर त्रास घ्यावा लागला. मात्र, या पाण्यामुळे घराघरात दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीची माहिती मिळताच मनसेच्या पदाधिकाºयांनी त्याठिकाणी जाऊन आंदोलन छेडले. मनसेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विकास पवार, उपाध्यक्ष महेश जगताप, तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.कॉलनीत साचलेले पाणी अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे साचल्याचा आरोप यावेळी मनसेच्या पदाधिकाºयांनी केला. तसेच संबंधित विभागातील अधिकाºयांना त्याठिकाणी बोलावून घेण्यात आले. गुडघाभर पाण्यात अधिकाºयांना उभे करून जाब विचारण्यात आला. संबंधित अधिकाºयांना घेराव घालीत घटनेविषयी संताप व्यक्त केला. कॉलनी, रस्त्यावर साचलेले पाणी हटविण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन यावेळी अधिकाºयांकडून देण्यात आले.मनसेच्या पदाधिकाºयांचे बोंबाबोंब आंदोलनअण्णा नांगरे कॉलनीत पोहोचलेल्या मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिकाºयांविषयी संताप व्यक्त केला. तसेच गुडघाभर पाण्यात उभे राहून बोंबाबोंब आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून संबंधित विभागाचा निषेध करण्यात आला. आंदोलनस्थळी आलेल्या अधिकाºयांनाही मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुमारे तासभर पाण्यात उभे ठेवले होते. डासांचा त्रास व पाण्यामुळे यावेळी अधिकारीही हैराण झाल्याचे दिसत होते.