शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा १०० टीएमसीच्या दिशेने; कोयनेत दररोज २ ते ३ टीएमसीने वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:44 IST

साडे सात हजार क्यूसेक विसर्ग 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून धरणक्षेत्रातही दमदार हजेरी आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागलाय. शनिवारी प्रमुख ६ धरणांतील पाणीसाठा ९४ टीएमसीवर पोहोचला होता. तर कोयनेत दररोज सरासरी २ ते ३ टीएमसीने वाढ आहे. त्यामुळे कोयनेतील साठाही ६४ टीएमसी झाला. तर सध्या तीन धरणांतून सुमारे साडे सात हजार क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे.जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या अधिक पर्जन्यमान झाले. यामुळे छोटे पाणी प्रकल्प भरुन वाहू लागले आहेत. तसेच ओढेही वाहत आहेत. पण, या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवर मोठा परिणाम झालेला आहे. अशातच अजुनही पाऊस सुरूच आहे. विशेष करुन पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक आहे. सातारा तालुक्याचा पश्चिम भाग, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात दमदार पाऊस होत आहे. त्याचबरोबर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढलाय. सध्या या सहा धरणातील साठा ९४ टीएमसीवर पोहोचला आहे.

शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६४ मिलिमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ६८ आणि महाबळेश्वरला ५५ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात २८ हजार क्यूसेक पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ६३.८८ टीएमसी झाला होता. ६०.६९ टक्के हा साठा आहे. त्यातच इतर प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. धोम धरणातील पाणीसाठाही ९ टीएमसीवर गेला आहे. जवळपास ६७ टक्के साठा झालाय.कण्हेर धरण १०.१० टीएमसी क्षमतेचे आहे. सध्या या धरणात ७.३२ टीएमसी साठा झालाय. उरमोडी धरणातही ७.२४ टीएमसी म्हणजे ७३ टक्क्यांजवळ पाणीसाठा पोहोचलाय. सध्या कोयनासह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या धरणांत ९४ टीएमसीहून अधिक पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे ही धरणे भरण्यासाठी अजून ५४ टीएमसीची आवश्यकता आहे.

कण्हेर ३०१८, उरमोडीतून ३३८६ विसर्ग सुरू..जिल्ह्यातील अनेक धरणे भरु लागली आहेत. त्यातच पावसाळ्याचे अजून पावणे तीन महिने बाकी आहेेत. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग सुरू झालेला आहे. कोयनातून १ हजार ५० क्यूसेक विसर्ग होत आहे. तर कण्हेर धरणातून ३ हजार १८ आणि उरमोडीमधून ३ हजार ३८६ विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ७० टीएमसीवर गेल्यानंतर दरवाजातून विसर्ग सुरू होण्याचा अंदाज आहे.

कोयनेचा पाऊस १८७० मिलिमीटर..एक जूनपासून जिल्ह्यात सर्वत्रच चांगला पाऊस झालेला आहे. तरीही पश्चिम भागात अधिक पर्जन्यमान झाले आहे. कोयनानगर येथे १ हजार ८७०, नवजा येथे १ हजार ६६४ आणि महाबळेश्वरमध्ये १ हजार ७४० मिलिमीटर पाऊस झालेला आहे. मागीलवर्षीपेक्षा यंदा पाऊस अधिक झाला आहे.