शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती गंभीर; संभाव्य आराखडा तयार 

By नितीन काळेल | Updated: December 21, 2023 19:28 IST

माण, खटाव, वाई, कोरेगाव तालुक्यात भीषणता वाढणार

सातारा : जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने टंचाईची स्थिती गंभीर बनत असून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते जूनपर्यंतचा संभाव्य टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ३५ कोटींचा खर्च येऊ शकतो. यामध्ये ५२१ टॅंकर लागू शकतात. तसेच नळपाणी पुरवठा योजना, विहिरी अधिग्रहित आदी खर्चाचा समावेश आहे. तर माण, खटाव, वाई, कोरेगाव तालुक्यात भीषणता वाढणार आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच पिके आणि पिण्याच्या पाण्याचे गणित अवलंबून असते. मागील चार वर्षांत चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे टंचाईवर फारसा खर्च झाला नाही. पण, यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७० टक्केच पाऊस झाला. तसेच कोणत्याही तालुक्यात १०० टक्के पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे टंचाईची स्थिती आहे. त्यातच यंदा कमी पावसामुळे टंचाईची भीषणता वाढणार आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते जून २०२४ पर्यंतच्या ९ महिन्यांसाठी संभाव्य टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यानुसार टंचाई निवारणावर ३५ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा अंदाज आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबरपासून तीन-तीन महिन्यांचा आराखडा केला आहे. त्यानुसार १ हजार ८३९ गावे आणि २ हजार १२२ वाड्यांना टंचाईची झळ पोहोचू शकते. यामध्ये नवीन ३२० विहिरी घ्याव्या लागतील. ४४ नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करावी लागणार आहे. ३८ तात्पुरत्या पुरक नळपाणी पुरवठा योजना कराव्यात लागतील. तर ५२१ टॅंकर लागणार आहेत. तसेच १०८ विहिरींसाठी खोलीकरण, गाळ काढणे आणि आडवी बोअर घेणे अशी कामे करावी लागू शकतात. टंचाईच्या या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी