शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर कृष्णा-कोयनेच्या पाण्याचे शिंपण, राजकारण्यांच्या स्पर्शाने स्मृतिस्थळ अपवित्र झाल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 15:22 IST

‘यशवंतराव चव्हाण यांची तत्वं वेशिला टांगणाऱ्या राजकीय नेत्यांना शेतकरी, त्यांच्या मुला-मुलींच्या आत्महत्या दिसत नाहीत. अशा राजकारण्यांच्या स्पर्शाने यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतिस्थळ अपवित्र झालं आहे,’ असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी स्मृतिस्थळावर कृष्णा, कोयना नदीतील पाण्याचं शिंपण केलं. 

कऱ्हाड - ‘यशवंतराव चव्हाण यांची तत्वं वेशिला टांगणाऱ्या राजकीय नेत्यांना शेतकरी, त्यांच्या मुला-मुलींच्या आत्महत्या दिसत नाहीत. अशा राजकारण्यांच्या स्पर्शाने यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतिस्थळ अपवित्र झालं आहे,’ असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी स्मृतिस्थळावर कृष्णा, कोयना नदीतील पाण्याचं शिंपण केलं. 

‘यशवंत विचारांची नावे घेऊन भाषणे केली जातात. मतासाठी यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेतलं जातं. परंतु कृती विरोधी केली जाते. या सर्व राजकीय नेत्यांच्या स्पर्शाने अपवित्र झालेले स्मृतीस्थळ कृष्ण कोयनेच्या पवित्र पाण्याने स्वच्छ केलं,’ असे यावेळी सांगण्यात आलं. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ, कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, युवा आघाडी अध्यक्ष, रोहित पाटील योगेश झांबरे उपस्थित होते. 

हे आंदोलन रविवारीच करण्यात येणार होतं. परंतु, पोलिसांना अगोदरच सुगावा लागल्याने बंदोबस्त वाढविण्यात आला होता. त्यामुळे हे आंदोलन करता आले नव्हते. ते सोमवारी करण्यात आलं.

टॅग्स :Yashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाण