शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कासच्या सांडव्यावरून वाहू लागले पाणी, सातारकरांची मिटली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 14:42 IST

साताऱ्याला पाणीपुरवठा करीत असलेला कास तलाव दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरला. तलावाच्या सांडव्यावरून गुरुवारी पहाटे सात वाजल्यापासून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देकासच्या सांडव्यावरून वाहू लागले पाणी, सातारकरांची मिटली चिंताजुलैमध्येच कास तलाव ओसंडून वाहू लागला

पेट्री (सातारा) : साताऱ्याला पाणीपुरवठा करीत असलेला कास तलाव दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरला. तलावाच्या सांडव्यावरून गुरुवारी पहाटे सात वाजल्यापासून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली आहे.दरम्यान कण्हेर तसेच उरमोडी धरणाच्या पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन भांबवली तसेच एकीवचा धबधबाही मोठ्या प्रमाणावर कोसळू लागला आहे.यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावत दोन-तीन वेळा पडलेल्या मुसळधार पावसातच तलावातील पाणीसाठा पाच फुटाने वाढला होता. त्यानंतर पावसाने काही दिवस उसंत घेत कमी अधिक प्रमाणात पावसाची रिमझिम सुरू होती.

यावेळी तलावाच्या पाणीपातळीत संथगतीने वाढ होत मंगळवारी सकाळपर्यंत सतरा फुटांपर्यंत पाणी पातळी झाली होती. दरम्यान मागील आठवड्यात या परिसरात उनाचे देखील अधूनमधून दर्शन होत होते. मंगळवारपासून पावसाने जोर धरत गुरुवारी पहाटेपासून तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला.जून निम्मा संपला तरी साताऱ्याच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात होता. दिवसेंदिवस पाणी पातळीत कमालीची घट होऊन कासचा पाणीसाठा सहा फुटांवर आला होता. यंदाही २००३ ची पुनरावृत्ती होते की काय? अशी काळजी लागून राहिली होती.कास परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून, मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे तलावातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला. पहिल्याच दोन दिवसांच्या पावसात पाच फुटाने पाणीसाठा वाढला होता. त्यानंतर पावसाचा काहीसा जोर ओसरून अगदी काही दिवसांत दोन फुटांनी वाढ झाली होती. पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावत अर्धा टीएमसीच्या आसपास क्षमता असणारा कास तलाव पूर्णपणे भरत ओव्हरफ्लो झाला आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसरDamधरण