शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कोयनेतील पाणीसाठा अर्धशतकाकडे, पश्चिम भागात उघडझाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:02 PM

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरू असून, कोयना धरणातील पाणीसाठ्याने अर्धशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत धरणात ४९.३९ टीमएसी साठा झाला होता. तर इतर धरणातीलही पाणीसाठा वाढत असून, बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात १०.३२ तर २४ तासांत सरासरी ०.८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

ठळक मुद्दे कोयनेतील पाणीसाठा अर्धशतकाकडे, पश्चिम भागात उघडझापसातारा जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ०.८७ मिलिमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरू असून, कोयना धरणातील पाणीसाठ्याने अर्धशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत धरणात ४९.३९ टीमएसी साठा झाला होता. तर इतर धरणातीलही पाणीसाठा वाढत असून, बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात १०.३२ तर २४ तासांत सरासरी ०.८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.जिल्ह्याच्या पश्चिम भागात १५ दिवस दमदार पाऊस पडल्यानंतर दोन-तीन दिवस उघडीप मिळाली; पण आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे. सध्या कमी-अधिक फरकाने पाऊस पडत आहे. कोयना आणि नवजा येथे चांगला पाऊस झाला. तर महाबळेश्वरला उघडीप असल्याचे दिसून आले. पूर्व भागात मात्र पावसाने चांगलीच दडी मारली आहे.जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे. सातारा ० (६१८.६८), जावळी ०.३३ (७२७.४८), पाटण ५.०९ (६३९.४८), कºहाड ० (२८३.१५), कोरेगाव ० (२४३.८९), खटाव ० (१४३.२५), माण ०.५७ (७८.४१), फलटण ० (७५.११), खंडाळा ० (१७३.२५), वाई ० (२५३.७०), महाबळेश्वर २.३३ (२३३५.३८) याप्रमाणे आजपर्यंत एकूण ५५७१.७८ तर सरासरी ४२८.८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.धरणक्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोयना ५१ (२१७४), नवजा ५५ (२४००) आणि महाबळेश्वर २ (२०९०).प्रमुख धरणांतील पाणीसाठागुरुवारी सकाळी सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांतील उपयुक्त पाणीपातळी टीएमसीमध्ये व टक्केवारी कंसात अशी आहे. धोम - ३.०३ (२५.८८), धोम-बलकवडी- २.०१ (५०.८३), कण्हेर- ५.१७ (५३.८९), उरमोडी- ३.९६ (४१.००), तारळी- ४.१९ (७१.६४), नीरा-देवघर ५.४२ (४६.२२), भाटघर- १०.८४ (४६.१४), वीर - ६.५४ (६९.५२).

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर