शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

कोयना धरणात पाण्याची आवक वाढली, पाणीसाठा पोहोचला ९३ टीएमसीवर 

By नितीन काळेल | Updated: September 30, 2023 17:25 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारपासून पाऊस पडत असून कोयना धरणक्षेत्रातही हजेरी लावली. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारपासून पाऊस पडत असून कोयना धरणक्षेत्रातही हजेरी लावली. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ९३ टीएमसीवर पोहोचला. तर धरण भरण्यासाठी आता १२ टीएमसीची पाण्याची गरज आहे. त्याचबरोबर काेयनेला ३१ तर नवजाला २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्याच्या पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाला सुरूवात झाली आहे. हा परतीचा पाऊस पडत आहे. तरीही सर्वत्रच पावसाची हजेरी नाही. दररोज कोठे ना कोठे पाऊस होत आहे. शुक्रवारी तर पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, तापोळा, बामणोली भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद कोयनेला ३१ मिलीमीटरची झाली आहे. यानंतर नवजा आणि महाबळेश्वर येथे प्रत्येकी २१ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून शनिवारी सकाळच्या सुमारास ५२५७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर शुक्रवारी सकाळच्या सुमारास १६०० क्यूसेक वेेग होता. यावरुन धरणातील आवक पावसामुळे वाढल्याने साठाही वाढत चालला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ९३.०२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. यावरुन धरणात ८८.३८ टक्के साठा झाल्याचे स्पष्ट झाले. तर धरण भरण्यासाठी अजून १२ टीएमसीवर पाण्याची गरज आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे.दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी ही मोठी धरणे आहेत. यामधील उरमोडीतील पाणीसाठा चिंताजणक आहे. हे धरण अजुनही ६० टक्के भरलेले नाही. परतीचा पाऊस कितपत पडणार यावर धरणसाठा अवलंबून राहणार आहे. तसेेच पूर्व भागातही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अजुनही बहुतांशी धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे चिंता वाढलेली आहे.

कोयना पाऊस चार हजारच्या उंबरठ्यावर..पश्चिम भागात दरवर्षीच पावसाचे प्रमाण अधिक असते. यावर्षी जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ५५७२ मिलीमीटर पडलेला आहे. तर महबळेश्वरला ५३६८ मिलीमीटरची नोंद झाली. कोयनानगर येथे यंदा कमी पाऊस झालेला आहे. आतापर्यंत ३९५९ मिलीमीटर पाऊस झाला असून गतवर्षीपेक्षा कमी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण