शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

‘घड्याळवाले बाळासाहेब’ पुन्हा कपबशी घेणार...

By admin | Updated: April 25, 2015 00:01 IST

जिल्हा बँकेतील नाराजी नाट्य : शंभूराज यांची माघार ; उंडाळकरांसाठी राष्ट्रवादीचे नेत सरसावले

प्रमोद सुकरे / कऱ्हाड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षाविरोधात बंड केले आहे. विधानसभेला राष्ट्रवादीचे घड्याळचिन्ह घेऊन आमदार होणारे बाळासाहेब आता पुन्हा आवडते कपबशी चिन्ह घेऊन निवडणूक जिंकणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याविरोधात पैलवान धनाजी पाटील-आटकेकर यांनी सोसायटी मतदार संघातून दंड थोपटल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक ५ मे रोजी होत आहे. त्यासाठी उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रक्रिया मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. मात्र, शुक्रवारी शेवटच्या दिवशी दादाराजे खर्डेकरांच्या पारड्यातच वजन पडल्याने बाळासाहेबांनी बंडाचे निशाणच हाती घेतले आहे. प्रक्रिया मतदारसंघात मर्यादित मतदान आहे. त्यातील फलटण अन् सातारा तालुक्यांतच पन्नास टक्के मतदान असल्याने राजेंनाच पुन्हा संधी देण्यात आल्याचे बोलले जाते; पण त्यामुळे बाळासाहेबांचे नाराजी नाट्य पाहायला मिळाले, हे निश्चित. दरम्यान, कऱ्हाड तालुक्यातून सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादीशी सलगी असणाऱ्या विलासराव पाटील-उंडाळकरांना उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यांच्याविरोधात नक्की कोण पैलवान रिंगणात उतरणार, याची उत्सुकता होती. पण, शुक्रवारी मानसिंगराव जगदाळे, प्रकाश पाटील, डी. बी. जाधव यांच्या अर्ज माघारीनंतर पैलवान धनाजी पाटील-अटकेकर यांनी दंड थोपटल्याचे स्पष्ट झाले. आटकेकर हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे दक्षिणच्या फडात कोण बाजी मारणार, हे पाहावे लागणार आहे. पाटण तालुक्यातून आ. शंभूराज देसाई यांनी विक्रमसिंह पाटणकरांचा विजयाचा मार्ग सुकर केल्याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेत राजकारण नको, असा सूर आळविणाऱ्या देसार्इंनी अर्ज मागे घेतल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहेत.