शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सातारा शहरालगतच्या दिव्यनगरीत जायचंय.. नको रे बाबा, वाहनधारक, नागरिक मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 17:39 IST

सातारा शाहूपुरीतून दिव्यनगरी, कोंडवेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा, अशी झाली आहे. या रस्त्यात पडलेल्या मोठ-मोठाल्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालकही या ठिकाणी भाडे घेऊन येण्यास धजावत नाही. स्कूलबस बंद झाल्यानेही शाळकरी विद्यार्थ्यांना दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत असून, दिव्यनगरीत जायचंय.. नको रे बाबा अशी प्रतिक्रिया वाहनधारकांमधून उमटत आहे.

ठळक मुद्देशालेय विद्यार्थ्यांचीही पायपीट सुरू खराब रस्त्यामुळे स्कूलबस बंद

सातारा : शाहूपुरीतून दिव्यनगरी, कोंडवेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा, अशी झाली आहे. या रस्त्यात पडलेल्या मोठ-मोठाल्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालकही या ठिकाणी भाडे घेऊन येण्यास धजावत नाही. स्कूलबस बंद झाल्यानेही शाळकरी विद्यार्थ्यांना दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत असून, दिव्यनगरीत जायचंय.. नको रे बाबा अशी प्रतिक्रिया वाहनधारकांमधून उमटत आहे.

गाव तेथे रस्ता हे सरकारचे धोरण असताना सातारा शहरालगतच्या भागातील चित्र मात्र वेगळेच दिसत आहे़ शाहूपुरी चौक ते दिव्यनगरीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, हा रस्ता केवळ कागदोपत्री शिल्लक राहिला आहे की काय, असा भास होऊ लागला आहे.

शाहूपुरीपासून सुमारे दोन किलोमीटरच्या या रस्त्यावरील खडी पूर्णपणे उखडून गेल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहने चालविताना सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सुमारे तीन वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. साताऱ्याहून मेढ्याकडे जाणारा हा पर्यायी मार्ग असल्याने या मार्गावरून पूर्वी सतत वाहतूक सुरू होती. मात्र, रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने या मार्गावरील वाहतूकही आता पूर्णपणे बंद झाली आहे.

दिव्यनगरीतून अनेक विद्यार्थी शाळेसाठी शाहूपुरी अथवा साताऱ्याला येतात. या विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूलबसही आता बंद झाल्याने विद्यार्थ्यांना दररोज सुमारे दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

जिल्हा परिषदेच्या कार्यकक्षेत येणारा हा भाग असून, विविध राजकीय पक्षांकडून तीन वेळा या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले़ परंतु अद्यापही या रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थी तसेच वाहनधारकांची अडचणीतून सुटका करावी, अशी मागणी रहिवाशांमधून होत आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा