शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

सातारा : फलटणच्या भिंती बनल्या स्वच्छतादूत, रातोरात बदलले रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 13:53 IST

ऐतिहासिक फलटणनगरी तशी पाहताक्षणी डोळ्यात भरणारी. फलटण शहर हे ऐतिहासिक वास्तू व मंदिरांनी बनले आहे. अशा या सुंदर नगरीचे रूप रातोरात बदलतेय ते सध्या सुरू असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत. कारण येथील घरांच्या भिंती रंगांनी सजवून त्यावर स्वच्छतेचा संदेश लिहिण्यात आला आहे.

ठळक मुद्दे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत बोलू लागल्याफलटणच्या भिंती बनल्या स्वच्छतादूतरातोरात बदलले रूप

फलटण: ऐतिहासिक फलटणनगरी तशी पाहताक्षणी डोळ्यात भरणारी. फलटण शहर हे ऐतिहासिक वास्तू व मंदिरांनी बनले आहे. अशा या सुंदर नगरीचे रूप रातोरात बदलतेय ते सध्या सुरू असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत. कारण येथील घरांच्या भिंती रंगांनी सजवून त्यावर स्वच्छतेचा संदेश लिहिण्यात आला आहे.

फलटणच्या नागरिकांना गेली अनेक वर्षे स्वच्छतेची सवय अंगवळणी पडलेली आहे. येथील घंटा गाडीने दशकपूर्ती केव्हाच केली आहे. पूर्वी सुंदर व स्वच्छ असणाऱ्या फलटणचे रूप स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने रात्री-दोन रात्रीत बदलताना नागरिकांना अनुभवयास मिळाले आहे.

फलटणचा बसस्थानक परिसर मुधोजी हायस्कूल, शासकीय विश्रामगृह, माळजाई मंदिर परिसर, खजिना हौद, नगरपालिका, मलटणमधील बाह्य रस्ते, महादेव मंदिर या सर्व ठिकाणांचा कायापालट झालेला दिसत आहे.पूर्वी याच इमारतीच्या भिंती काही समाजकंटकांनी विद्रूप करून टाकल्या होत्या. अनेक ठिकाणच्या भिंती मळक्या झाल्या होत्या. काही ठिकाणी कचऱ्यांचे ढीग साठले होते. सुंदर फलटणच्या सौंदर्यात या गोष्टी बाधा आणत होत्या; पण नगरपालिका कर्मचारी आणि नागरिकांनी रातोरात ही सर्व ठिकाणे स्वच्छ केली आणि रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या भिंतींनाच स्वच्छतादूत बनविले.

रंगात स्वच्छता व सामाजिक संदेशांनी या सर्व भिंती बोलू लागल्या आहेत. या भिंतीवरचे स्वच्छता संदेश नागरिकांच्या हृदयापर्यंत पोहोचत आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर