शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वाई नगरपालिकेने मालमत्ताकरात केली तीस टक्के वाढ, नागरिकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 18:51 IST

नवीन कर आकारणीनंतर प्रथम सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांमुळे नगरपालिकेला जवळ-जवळ दीड कोटी जास्त उत्पन्न मिळणार

वाई : नगरपालिकेने मालमत्ताकरांमध्ये तीस टक्के वाढ केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शासनाच्या नियमानुसार नगरपालिकेने चार वर्षांनी मालमत्ता सर्वेक्षण करून जुन्या मालमत्ता करात वाढ प्रस्तावित केली आहे. नवीन सर्वेक्षणामुळे मालमत्ता करामध्ये तीस टक्के वाढ होणार आहे. सुधारित मालमत्ता कराच्या नोटिसा पाठवण्यात आल्य़ा आहेत. त्यात तीस दिवसांत हरकत नोंदवण्यास मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी या तीस टक्के वाढीला विरोध दर्शवला आहे.सातारा व मेढा नगरपालिकेप्रमाणे याला स्थगिती मिळावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने व्यावसायिक, नागरिकांनी बैठकीचे आयोजन केले होते, यावेळी वाढीव घरपट्टीला विरोध करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. यामध्ये वाईतील नागरिकांनी व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. पालिकेच्यावतीने सुधारित मालमत्ता सर्वेक्षण हे पालिकेने न करता लाखो रुपये खर्च करून खासगी समितीच्यावतीने करण्यात आले. कराच्या उत्पन्नावर पालिकेचा कारभार चालत असेल, तर हा खर्च करणे गरजेचे आहे का..? असाही प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून सुधारित दरवाढीला स्थगिती आणावी, अशीही मागणी होत आहे.मालमत्ता करवाढीच्याविरोधात कोणत्याच पक्षाचे प्रतिनिधी, नगरसेवक आवाज उठवत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. चतुर्थ वार्षिक सर्वेक्षण व कर आकारणीनंतर नगरपालिकेचे उत्पन्न वाढणार आहे. नवीन कर आकारणीनंतर प्रथम सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांमुळे नगरपालिकेला जवळ-जवळ दीड कोटी जास्त उत्पन्न मिळणार आहे. महागाईमुळे त्रस्त असताना नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटिसा मिळाल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. तसेच वाईकर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

अगोदरच कोरोनाच्या संकटात व्यावसायिकांची घडी विस्कटली होती. त्याकाळातही व्यावसायिकांनी पालिकेचा कर व पालिकेच्या दोनशे गाळ्यांचे भाडे नियमित दिले आहे. या करवाढीचा व्यावसायिकांना मोठा फटका बसणार असून, पालिका प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून करवाढ करावी - सचिन फरांदे - अध्यक्ष, व्यापारी संघटना, वाई.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwai-acवाई