शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:06 IST

लोकसभा मतदानादिवशी साताऱ्यातील ज्ञानदीप विद्यामंदिर या नगर पालिकेच्या शाळेत मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देमुलाकडून वडिलांना बेदम मारहाणडिझेल ओतून पेटवून विवाहितेची आत्महत्या

सातारा : लोकसभा मतदानादिवशी साताऱ्यातील ज्ञानदीप विद्यामंदिर या नगर पालिकेच्या शाळेत मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला.संबंधिताने स्वत: मतदान करताना व्हिडीओ तयार केला. त्यानंतर सोशल मीडियावर प्रसारित केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मतदानाच्या केंद्रप्रमुखांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित व्हिडीओ पोलिसांकडे देण्यात आला असून, मतदानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.मुलाकडून वडिलांना बेदम मारहाणघरगुती वादातून मुलाने वडिलांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी साताऱ्यात घडली. जखमी वडिलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बबन बाब बाबर (वय ६०, रा. शाहूपुरी सातारा) असे मारहाणीत जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, घरगुती कारणावरून चिडून जाऊन अमोल बाबर (वय ३०) याने वडील बबन बाबर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता.

डिझेल ओतून पेटवून विवाहितेची आत्महत्याशिवथर, ता. सातारा येथील सारिका दशरथ भंडारे (वय २३) या विवाहितेने जाचहाटाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सारिकाचा विवाह दशरथ भंडारे याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच तिचा जाचहाट सुरू झाला.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी सात वाजता घरातील अन्य लोक झोपेत असताना सारिकाने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले. त्यामध्ये ती ९९ टक्के भाजून गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर