शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिनेत्याने येथे केले मतदान आणि श्रमदानही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 13:59 IST

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील अभिनेत्याने येथे केले मतदान आणि श्रमदानही. अभिनेते विपुल साळुंखे यांनी मंगळवारी आपला मतदानाचा हक्क बजावून सामाजिक बांधिलकी जपत आसनगाव, ता. कोरेगाव येथे हाती टिकाव, खोरे हाती घेऊन श्रमदान केले.

ठळक मुद्देअभिनेते विपुल साळुंखे यांनी मतदान करून केले श्रमदानपाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत श्रमदान

सातारा : माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील अभिनेत्याने येथे केले मतदान आणि श्रमदानही.अभिनेते विपुल साळुंखे यांनी मंगळवारी आपला मतदानाचा हक्क बजावून सामाजिक बांधिलकी जपत आसनगाव, ता. कोरेगाव येथे हाती टिकाव, खोरे हाती घेऊन श्रमदान केले.पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या चौथ्या पर्वास अलोट उत्साहात सुरुवात झाली असून, कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील दुष्काळ हद्दपार करण्याचा विडाच जणू ग्रामस्थांनी उचललेला आहे. त्यामुळे ओसाड माळरानावर श्रमदान करणाऱ्यां जलदुतांमुळे शिवार फुललं आहे.

दरम्यान, मंगळवारी अभिनेते विपुल साळुंखे यांनी सहपरिवार आपल्या गावी भादे, ता. खंडाळा येथे मतदान केले. त्यांनी आसनगावमधील डोंगराच्या पाथ्याला हातात टिकाव, फावडे, घमेलं घेऊन श्रमदान केले. त्यांच्यासोबत नम्रता साळुंखे, दिशा साळुंखे, विराज साळुंखे व संग्राम साळुंखे यांनीही श्रमदान करून समतल चर खोदले.यावेळी विपुल साळुंखे म्हणाले, ह्यकोरेगाव तालुक्यातील उत्तर भागावर बहुतेकवेळा निसर्गाची वक्रदृष्टी असते. यंदाही प्रतिकूल परिस्थितीने डोळे वटारले आहेत. दुष्काळाने जनता होरपळून निघाली आहे. पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. अशी सर्व विपरित परिस्थिती असली तरी प्रतिकूल परिस्थितीच्या छताडावर पाय रोवून संकटांना भिडण्याची अंगीभूत वृत्ती आसनगावकरांनी सोडलेली नाही. याचाच प्रत्यय इथे आल्यानंतर येते.

अगदी अडीच वर्षांच्या बालकापासून ९० वर्षांच्या वृद्धांचे श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावल्यास राज्यातील प्रत्येक गाव पाणीदार होणार आहे.

यावेळी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका युंगधरा साळेकर, शाखाप्रमुख यशवंत साळेकर आसनगावच्या उपसरपंच स्मिता शिंदे, संभाजीराव शिंदे, अनिल शिंदे, प्रदीप शिंदे, वीरसिंग शिंदे, शंकर गाडे, जगदीश शिंदे, प्रशांत शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsatara-pcसाताराWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाMazya Navryachi Baykoमाझ्या नवऱ्याची बायको