शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास पाटील यांनी संमेलनाचे अध्यक्षपद सोडावे - भारत पाटणकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 14:05 IST

जातीयवादी लोकांत सामील झाल्याने त्यांची अवनती

सातारा : लेखक विश्वास पाटील यांची पुस्तके शुद्र-अतिशुद्रांच्या जीवनावर आहेत. अशा लेखकाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारावे, ही त्यांची अवनती आहे. ते राजमान्य राजश्री विश्वासराव पाटील झाले आहेत. जातीयवादी लोकांत सामील होऊन त्यांनी एकप्रकारे आत्महत्याच केली आहे. त्यांनी अध्यक्षपद सोडावे, अन्यथा सर्व शोषित जाती-जमाती त्यांच्या सातारा प्रवेशाला विरोध करतील, असा इशारा डाॅ. भारत पाटणकर यांनी दिला आहे.सातारा येथील ‘सुटा’च्या कार्यालयात विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत डाॅ. पाटणकर बोलत होते. डाॅ. पाटणकर म्हणाले, सातारा हा महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा मूळ जिल्हा आहे. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य आणि शिक्षणही येथेच झाले आहे. येथेच आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन बिघडलेल्यांचे आहे. अशा संमेलनाचे अध्यक्षपद विश्वास पाटील यांनी स्वीकारावे ही त्यांची अवनती आहे. ते पूर्ण धर्मांध व जातीयवाद्यांत सहभागी झाले आहेत. लोकांनीही अशा संमेलनाला जाऊ नये.

वाचा- संमेलनाध्यक्ष खोटे बोलतात, विश्वास पाटील यांच्या भावाचाच गंभीर आरोपअजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी आपल्या विधानाबद्दल बहुजन जाती-जमातीची, सातारा गॅझेटमध्ये जे १०० टक्के कुणबी आहेत; पण त्यांना मराठा म्हणून आरक्षण नाकारले जाते, त्या कुणबी समाजाची माफी मागावी व अध्यक्षपद सोडावे. असे झाले नाही, तर सर्व जनता, शोषित जाती विरोध करतील. प्रतिसरकारचा हा जिल्हा आहे, हेही लक्षात ठेवावे, असा इशाराही डाॅ. पाटणकर यांनी दिला.नवीन लिखाण नसल्याने उत्सवमूर्ती..चुकीच्या छावणीत आणि विचारात प्रवेश न करण्याचा पर्याय निवडावा असे वाटते, असा सल्लाही डॉ. पाटणकर यांनी विश्वास पाटील यांना दिला. त्याचबरोबर नवीन काही त्यांच्याकडून लिखाण नाही. त्यामुळे त्यांनी उत्सवमूर्ती होण्याचे ठरविले असावे. त्यातूनच अध्यक्षपद स्वीकारले, असा टोलाही लगावला.