शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्याच्या विरोधात कराडमध्ये भाजपाची तीव्र निदर्शने, पोलिसांकडून आंदोलकांना अटक

By प्रमोद सुकरे | Updated: December 17, 2022 14:31 IST

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून दिले

कराड : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल घृणास्पद टीका करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड येथील दत्त चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले व प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी भुट्टो यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला निषेध व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या निषेधार्थ आज भाजपाच्यावतीने देशभर जोरदार आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून कराड येथे भाजपाच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘बिलावल माफी मांगो’ अशा घोषणा देत भुट्टो यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करुन आपला संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. यावेळी बोलताना अतुल भोसले म्हणाले, जगात सर्वांत मोठा लोकशाही देश असलेल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अश्लाघ्य विधान करणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा सर्वस्तरातून आम्ही निषेध करत आहोत. आपल्या अपरिपक्व मताने भुट्टो यांनी त्यांच्या देशाची लाज वेशीवर टांगली आहे. स्वत:च्या देशातील समस्या सोडविता येत नसल्याने अशी विधाने करुन ते खळबळ माजविण्याचा प्रयत्न करत असून, याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मोदींच्या माध्यमातून जगात सर्वत्र भारताचे नाव उंचावत असताना, दहशतवाद्यांचा अड्डा असणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने केलेले विधान निंदनीय आहे. भविष्यात अशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला भारताकडून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपाचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी यावेळी दिला. आंदोलनात भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, तालुकाध्यक्ष  श्मामबाला घोडके, युवामोर्चाचे सुदर्शन पाटसकर, उमेश शिंदे, मुकुंद चरेगावकर, घनश्याम पेंढारकर, सुनील शिंदे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबा गावडे, राजू मुल्ला, बाळासाहेब घाडगे, सुरज शेवाळे, तानाजी देशमुख, संतोष हिंगसे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPakistanपाकिस्तानBJPभाजपा