शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कंपन्यांचा निषेध, अहिरे गावातील सुमारे २० ते २५ तरुण झाडावर उपोषणास बसले 

By दीपक शिंदे | Updated: September 6, 2023 14:29 IST

आंदोलनामध्ये सहभागी नसणाऱ्या काही ग्रामस्थांना हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून गावात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

श्रीमंत ननावरेखंडाळा : अहिरे, ता खंडाळा येथील कंपन्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गावातील पारावर असणाऱ्या झाडावर चढून आंदोलन सुरू केले आहे. या झाडावर सुमारे २० ते २५ तरुण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत प्रशासन येत नाही व आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार तरुणांनी केला आहे. तसेच वेळप्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.अहिरे गावात गेल्या महिन्यात ग्रामस्थांच्या वतीने येथील कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार व व्यवसायात संधी मिळावी म्हणून आंदोलन उभारण्यात आले होते. या संदर्भात तालुका प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्यासमोर झालेल्या संयुक्त बैठकांमध्ये अहिरे कार्यक्षेत्रातील कंपन्यांनी बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्या व त्यांना त्या चांगला प्रतिसाद देत आहेत; परंतु काही कंपन्या प्रतिसाद देत नाहीत. याउलट आंदोलनामध्ये सहभागी नसणाऱ्या काही ग्रामस्थांना हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून गावात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला जात आहे. यामधून गावामध्ये अनुचित प्रकार, भांडण व संघर्ष घडण्याचा संभव आहे. तसेच या तीन कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे बाकीच्या इतर कंपन्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून तरुणांनी गावातील पारावरील झाडावर चढून आंदोलन सुरू केले आहे.संबंधित कंपन्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यास व व्यक्तीस अशा घटनांविषयी आपण सूचित करावे, अन्यथा आम्ही गावाच्या पारावर चढून आत्मदहन करू. त्यास सर्वस्वी कंपन्या व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagitationआंदोलन