शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

विकास धस न्यायालयात हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:36 PM

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : खून प्रकरणात गुन्हा दाखल असलेले तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास धस तब्बल चौदा महिन्यांनी गुरुवारी येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर झाले. न्या. आर. टी. गोगले यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुप्तचर विभाग आज, शुक्रवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : खून प्रकरणात गुन्हा दाखल असलेले तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास धस तब्बल चौदा महिन्यांनी गुरुवारी येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर झाले. न्या. आर. टी. गोगले यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुप्तचर विभाग आज, शुक्रवारी त्यांचा ताबा घेण्याची शक्यता आहे.खासगी बसमधून ७७ लाखांचे अडीच किलो सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना मे २०१६ मध्ये कºहाडात घडली होती. याबाबतचा गुन्हा कºहाड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास धस या प्रकरणाचे तपासी अधिकारी होते. या प्रकरणातील संशयिताबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेला माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह सहा कर्मचारी संशयित रावसाहेब ााधवला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यांनी रावसाहेब जाधवसह अनिल दशरथ डिकोळे (वय ३६, रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेऊन कºहाडात आणले. १८ जून २०१६ रोजी तपासकामी त्या दोघांना घेऊन पोलीस कार्वेनाका चौकीत गेले होते. त्याठिकाणी प्रकृती खालावल्याने जाधवला उपचारार्थ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचदिवशी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला.रावसाहेबचा मृत्यू झाल्याचे समजताच करमाळा येथील शेकडोचा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला. या जमावाने पोलिसांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. तसेच तहसील कार्यालयावरही आक्रमक मोर्चा काढला. अखेर पोलीस अधीक्षकांनी निरीक्षक धस यांच्यासह बारा पोलिसांना निलंबित केले. तसेच मृत रावसाहेबचा मेहुणा अनिल डिकोळे याच्या फिर्यादीवरून बारा पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणातील सर्व आरोपी पोलीस तेव्हापासून फरार होते. सुरुवातीला या प्रकरणात हवालदार कृष्णा खाडे याला सीआयडीने अटक केली. त्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये सहायक पोलीस निरीक्षक काकंडकी यांच्यासह दहा पोलीस न्यायालयात हजर झाले. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या त्यातील काहीजणांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी निरीक्षक धस यांनी न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच फेटाळला आहे. त्यानंतर निरीक्षक धस न्यायालयीन प्रक्रियेत राहिले. अखेर गुरुवारी या प्रकरणात ते स्वत:हून येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. गोगले यांच्यासमोर हजर झाले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज निरीक्षक धस यांना गुप्तचर विभाग (सीआयडी) ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.-फिर्यादीचे पोलिसांवरील गंभीर आरोप१) रावसाहेब जाधवला बेकायदेशीररीत्या जबरदस्तीने कºहाडला आणले.२) कºहाडात कार्वेनाका पोलीस चौकीमध्ये त्याला डांबून ठेवले.३) काहीही संबंध नसताना त्याला अमानुष मारहाण केली.४) रावसाहेब जाधव व त्याच्या मेहुण्याकडे पैशाची मागणी केली.५) जीवघेणी मारहाण करून रावसाहेबचा खून केला.