आदर्की : ‘कोराना काळात शासनाचे सर्व नियम पाळून ग्राहक व सभासदांना वेळेत सुविधा देऊन विजय ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने संकटकाळी प्रामाणिक सेवा देण्याचे काम केले आहे,’ असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष विश्वासराव धुमाळ यांनी केले.
आदर्की बुद्रुक, ता. फलटण येथील विजय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सभा श्री भैरवनाथ मंदिर हॉलमध्ये आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी संस्थेचे व्यवस्थापक उत्तमराव धुमाळ यांनी अहवाल वाचन व पत्रिकेवरील विषय वाचन केल्यानंतर संचालक व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
वार्षिक सभेस संस्थापक प्रा. सुभाषराव धुमाळ, व्हा. चेअरमन सी. बी. पठाण, संचालक साहेबराव मोहिते, दशरथ बोबडे, शिवाजी शिंदे, पंढरीनाथ धुमाळ, राजेंद्र पवार, कृष्णात अनपट, बाबा खराडे, निवास काकडे, राजश्री धुमाळ, अंजना जाधव आदी सभासद, शाखाप्रमुख उपस्थित होते. कोविडमुळे सर्व नियमांचे पालन करून, मास्क घालून, सोशल डिस्टन्सिंग ठेवून वार्षिक सभा पार पडली. सर्वांचे स्वागत व्हा. चेअरमन सी. बी. पठाण यांनी केले. व्यवस्थापक उत्तमराव धुमाळ यांनी आभार मानले. (वा.प्र.)
फोटो..
25विश्वासराव धुमाळ