शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कास पुष्प पठारावर विघ्नहर्त्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 11:21 PM

विघ्नहर्ता : सह्याद्रीच्या व सातपुडा रांगेत ही वेलवर्गीय वनस्पती पाहावयास मिळते. तीन पानांच्या पाकळीची ही वेल इतर वनस्पतींच्या आधाराने ...

विघ्नहर्ता : सह्याद्रीच्या व सातपुडा रांगेत ही वेलवर्गीय वनस्पती पाहावयास मिळते. तीन पानांच्या पाकळीची ही वेल इतर वनस्पतींच्या आधाराने वाढते. पानांच्या खाचीतून बाहेर आलेले त्याचे फूल गणपतीच्या सोंडेसारखे दिसते. यावरून यास विघ्नहर्ता तसेच हत्तीची सोंड म्हणतात. याच्या मुळाशी लांब आकाराचा गोड चवीचा कंद असतो. सप्टेंबर महिन्यात यास लांबट स्वरुपाची शेंग येते. त्याच्या आतील दाणे गोड, तुरट असतात. याकडे पक्षी व कीटक आकर्षित होतात.जरतरी : ही वेलवर्गीय वनस्पती आहे. लालसर रंगाचे फूल असते. फुले, पानावर तूस असतात. बिया उडदासारख्या असतात. रताळ्यासारखा कंद जमिनीत असतो. ‘प्फ्लेमें जिया’ असे या फुलाचे शास्त्रीय नाव. तसेच हिलुरी असे ग्रामीण भागात म्हणतात. या फुलाची छबी कैद करण्याचा मोह आवरत नाही.नीलिमा : मुरडानिया सिप्लँक्स असे म्हणतात. निळ्या रंगाची तीन पाने असतात. डोळ्यांसारख्या काळसर रंगाचे तीन भाग असतात. तसेच तीन कोंब असतात. ही वनस्पती गवत वर्गीय प्रजातीतील आहे. त्यामुळे हे फूल पाहिल्यामुळे आल्हाददायी वाटत असते.गाववेली : ही वेलवर्गीय आहे. पिपाणीच्या आकाराचे फूल असते. आयफोमिया असे शास्त्रीय नाव आहे. काळी व पांढरी गवेली असे दोन प्रकार असतात. हे पांढऱ्या गवेलीचे फूल आहे.आभाळी : ही गवतवर्गीय वनस्पती आहे. याची पाने व देठ जाडसर असतो. त्याच्यावर सप्टेंबर महिन्यात आभाळी रंगाचे कप्या कप्याचे फूल येत असते. त्याच्यावर अनेक भाग दिसतात.