शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

पशूलाही लाजवतोय पशुवैद्यकीय दवाखाना!

By admin | Updated: January 8, 2015 23:59 IST

समस्यांचा विळखा : कातरखटाव येथील ५२ वर्षांच्या जुन्या इमारतीची दारे-खिडक्या गायब, सर्पांचा वावर

कातरखटाव : कातरखटाव, ता. खटाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना समस्यांच्या गर्तेत अडकला असून पशूलाही लाजवेल, अशी दुरवस्था झालेली आहे. ५२ वर्षांची जुनी इमारत धोकादायक बनल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.या इमारतीच्या पाया, भिंतीला भेगाळल्या आहेत. दारे, खिडक्या गायब असून कौले फुटलेली आहेत. भिंतीत पावसाचे पाणी मुरत असल्यामुळे सिमेंटचे प्लास्टर खराब झाले आहे. इमारतीला कंपाऊंड नसल्यामुळे कार्यालयाच्या परिसरात ग्रामस्थ शौचविधी करतात.ग्रामपंचायतीने नळ कनेक्शन तोडल्यामुळे वीस वर्षे झाली पाण्याची समस्या आहे. शौचालयाची सोय नाही. शेजारी बंधारा असल्यामुळे पावसाळ्यात कमरेएवढे गवत वाढते. त्यामुळे दवाखान्यात विषारी सापांचा वावर वाढला आहे. अनेकदा सकाळी दवाखाना उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांना सापाचे दर्शन होत असते. शासकीय इमारतीला पाणी पुरवठा मोफत असूनही ग्रामपंचायतीने नळ कनेक्शन तोडल्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे.संबंधित खात्याकडून गेली वीस वर्षे फक्त आश्वासने मिळत आहेत. कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे व सापांचा वावर असल्यामुळे भीतीपोटी अधिकारी किंवा कर्मचारी इथे रात्रीवेळी मुक्काम करीत नाहीत. डॉक्टरांना वैयक्तिक भाडोत्री खोली घेऊन राहावे लागत आहे. जनावरे घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मुक्काम डॉक्टर नसल्यामुळे त्रास होत आहे. सुविधांचा बोजवारा असल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने या इमारतीच्या दुरुस्तीचे लवकर काम मार्गी लावावे, अशी मागणी शेतकरी, अधिकाऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)वीस गुंठे दवाखान्याच्या जागेत ग्रामपंचायतीने अतिक्रमणे करून गाळे बांधले आहेत. प्रशासनाने या इमारतीचा १२ वर्षांपूर्वी इस्टिमेट प्लॅन काढून नेला आहे; परंतु अजूनही साधी खिडकीही बसली नाही. इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.- डॉ. सी. टी. राऊत, पशु वैद्यकीय अधिकारी