शहरं
Join us  
Trending Stories
1
"BMC आयुक्त कोण आहे, नाव लिहून ठेवा; कंट्रोल मुख्यमंत्र्यांकडेच आहे..."; मनोज जरांगेंचा इशारा
2
शरद पवारांचा 'सुसाईड बॉम्ब' म्हणून जरांगेंकडे पाहतात; भाजपा आमदार संजय केनेकरांचं खळबळजनक विधान
3
Manoj Jarange Patil Morcha Update Live: आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका- मनोज जरांगे
4
राजिनाम्यानंतर जगदीप धनखड यांचा पेन्शनसाठी अर्ज, कोण कोणत्या सुविधा मिळणार?
5
Delhi Murder Video: भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, सेवेकऱ्याला जीव जाईपर्यंत मारलं; दिल्ली हादरली
6
अमेरिकेचे नवं पाऊल...भारताला बसू शकतो मोठा झटका; १.६ अब्ज डॉलर्स गुंतवणूक धोक्यात
7
'शोले'मधून सचिन पिळगावकरांचा 'हा' सीन केलेला कट, पण फोटो आला समोर; अभिनेत्याला वाटलेलं वाईट
8
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता वाढताच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल पहिला निर्णय
9
जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
10
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
11
Dilshan Madushanka ODI Hattrick : या पठ्ठ्यानं अखेरच्या षटकात हॅटट्रिकचा डाव साधत फिरवली मॅच
12
रितेश देशमुखचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाला- "मनोज जरांगेजी हे..."
13
"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
14
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
15
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
16
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
17
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
18
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
19
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
20
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..

सासऱ्यासह मेव्हण्याने घातली जावयाच्या अंगावर गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 14:06 IST

मुलीला सतत त्रास देत असल्याचा आरोप करत सुमित सुरेश तपासे (वय ३०, रा. मल्हार पेठ, सातारा) यांना सासऱ्यासह मेव्हण्याने अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देजीवे मारण्याचा प्रयत्न, सासऱ्यासह मेव्हण्यावर गुन्हा पोलिसांकडून तपास सुरू

सातारा : मुलीला सतत त्रास देत असल्याचा आरोप करत सुमित सुरेश तपासे (वय ३०, रा. मल्हार पेठ, सातारा) यांना सासऱ्यासह मेव्हण्याने अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.याप्रकरणी मेव्हणा सुशांत मच्छीद्रनाथ शिंदे व सासरे मच्छिंद्रनाथ प्रल्हाद शिंदे (रा. सदर बझार सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तपासे आणि शिंदे कुंटुंबामध्ये मतभेद आहेत. दि. ९ रोजी हॉटेल राधिका पॅलेससमोरून सुमित तपासे हे चालत निघाले होते. त्यावेळी तेथून सासरे मच्छिंद्रनाथ शिंदे आणि मेव्हणा सुशांत शिंदे हे चारचाकीतून जात होते.

यावेळी सुशांत हा गाडी चालवत होता. एकमेकांकडे खुन्नसने पाहात सुमित तपासे यांच्या अंगावर त्याने गाडी घातली. यावेळी ते खाली पडले. पुन्हा त्यांच्या अंगावर गाडी घालण्यात आली. परंतु त्यांनी उडी मारल्याने ते वाचले.

जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी भेट दिली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर