शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वासोटा पर्यटन, बोटिंग पूर्ववत होणार, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; बोटिंग क्लब व्यावसायिकांमध्ये समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:33 IST

वासोटा पर्यटन आणि बोटिंग बंद असल्याने पर्यटनाशी निगडित सर्वच व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.

सातारा : कोरोना महामारीमुळे दोन महिन्यांपासून वासोटा पर्यटन बंद होते. त्यामुळे बामणोली परिसरातील बोट मालक, चालक आणि इतर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान, सोमवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वनसंरक्षक (वन्यजीव) समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधून वासोटा पर्यटन, बोटिंग त्वरित पूर्ववत सुरू करण्याची सूचना केली. यानंतर चव्हाण यांनी मंगळवार, दि. १ फेब्रुवारीपासून वासोटा पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला.वासोटा पर्यटन आणि बोटिंग बंद असल्याने दोन महिन्यांपासून बामणोली परिसरातील बोट मालक, चालक आणि पर्यटनाशी निगडित सर्वच व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. वासोटा पर्यटन आणि बोटिंग पूर्ववत सुरू व्हावे, यासाठी भैरवनाथ बोट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली आणि वासोटा पर्यटन आणि बोटिंग सुरू करून देण्याची मागणी केली.यावेळी भैरवनाथ बोट क्लबचे अध्यक्ष धनाजी संकपाळ, उपाध्यक्ष संजय शिंदकर, सचिव नीलेश शिंदे, सुभाष शिंदकर, राजेंद्र संकपाळ, राजेंद्र कांबळे, गोविंद शिंदकर, किसन भोसले यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.बामणोली भागातील बोटिंग आणि इतर व्यवसाय पर्यटनावर अवलंबून असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वासोटा पर्यटन बंद ठेवण्यात आले आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटन सुरू आहे. सर्व ठिकाणी सर्वकाही सुरू असताना कोरोनाचे कारण दाखवून वासोटा पर्यटन बंद ठेवणे म्हणजे बामणोली परिसरातील बोट चालक, मालक आणि पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या इतर सर्व व्यावसायिकांवर अन्याय करणे आहे. त्यामुळे किल्ले वासोटा पर्यटनासाठी त्वरित परवानगी द्या, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी चव्हाण यांना दिल्या. 

यानंतर चव्हाण यांनी मंगळवारपासून किल्ले वासोटा पर्यटन सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे सांगितले. यांनतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशीही संपर्क साधून वासोटा पर्यटन आणि बोटिंग सुरू होत असून, महसूल विभागाने व्यावसायिकांना सहकार्य करावे, असे सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले