परळी : परळी खोऱ्यातील निसर्गसौंदर्य हे सर्वज्ञात आहे. परळी खोरे हे डोंगरदऱ्यांनी वेढलेला असा भाग. याठिकाणी वन्यप्राण्यांचाही वावर हा सातत्याने पाहायला मिळतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून वणवा लावण्याचे प्रमाण वाढल्याने शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे. भागातील वणवा धगधगत असताना वनविभागाचे नक्की करतोय तरी काय? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे.
परळी खोऱ्यातील पांगारे, केळवली, नित्रळ, अलवडी, लुमणेखोल, सांबरवाडी अशा अनेक गावांच्या हद्दीतील डोंगर हे वणव्यामुळे काळेकुट्ट झाले आहेत. दरवर्षी हे वणव्यासारखे प्रकार घडत असताना, वनविभागाने याविषयी किती तयारी केली, काय
उपायोजना केल्या, अशाच पद्धतीचे प्रश्न हे उपस्थित होत आहेत. वणव्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अन् भागातील धगधगता वणवा हा नक्की केव्हा शमणार अन् वनविभागाला जाग केव्हा येणार, याचीच चिंता आता
ग्रामस्थांना भेडसावत आहे.
चौकट..
गवताळ डोंगर दाखवा अन् बक्षिसे मिळवा!
थंडीच्या
दिवसात वणवा लावण्याचे प्रकार काही विकृतांमुळे होत असतात. मात्र जीव
गमवावा लागतो तो वन्यप्राण्यांना. तसेच शेकडो हेक्टर क्षेत्र जळल्याने चाऱ्याचा प्रश्न अशा समस्या दरवर्षी आहेत. मात्र वनविभागाची कुशलता कुठेच
पाहायला मिळत नाही. सध्या भागात गवताळ डोंगर दाखवा अन् बक्षिसे जिंका, अशीच गत झाली आहे.
१२परळी
परळी खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून वणवा लावण्याचे प्रमाण वाढल्याने शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे.