शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

पुनर्रोपण केलेल्या शंभर वर्षांच्या वटवृक्षासोबत साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 16:45 IST

सयाजी शिंदे यांनी वटवृक्षाला केला अभिषेक

सातारा : शंभर वर्षांपूर्वीच हडपसर येथील वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई’ संस्थेला यश आले. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन रहावे म्हणून १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत म्हसवे येथे या वटवृक्षासोबत अनोखा 'व्हलेंटाईन डे ' साजरा करण्यात आला.२० हुतात्मा जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २० झाडे लावण्यात आली. वृक्षाची महती सांगणारी गाणी गाण्यात आली. कवी विठ्ठल वाघ यांनी ‘झाड वडाचे ताठ उभे’ हे गीत या समारंभासाठी पाठवले होते. त्याचे गायन करण्यात आले.

शंभर वर्षांचं झाड पुनरुज्जीवन करायला फक्त २५ हजार खर्च आला. अडचण होते, म्हणून ही झाडं काढून टाकून देता कामा नये. हा तर राष्ट्रीय वृक्ष आहे, त्याचे सन्मानाने २६ जानेवारी रोजी म्हसवे (सातारा) येथे पुनर्रोपण करण्यात आले.निवडणुकीत जिंकला तरी एखाद्याची आपण मिरवणूक काढतो, इथे तर शंभर वर्षांचा राष्ट्रीय वृक्ष वाचला आहे. म्हणून त्याच्या पालवीसोबत प्रार्थना करण्यात आली. सुवासिनींनी पूजा केली. सयाजी शिंदे यांनी वटवृक्षाला अभिषेक केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, श्रीकांत इंगळहळीकर, धनंजय शेडबाळे, मुकेश धीवर, मनोज बाविसकर, सुजीत जगदाळे, बाळासाहेब पानसरे, भानुदास गायकवाड, डॉ. रोशनआरा शेख, प्रा. तानाजी देवकुळे, प्रा. केशव पवार, प्रा. डॉ. बाबासाहेब कांगुने, डॉ. सचिन माने, प्रा. रवींद्र महाजन, प्रा. रामचंद्र गाडेकर, राजेंद्र आफळे, प्रा. विजय निंबाळकर, शाहीर चरण उपस्थित होते. प्रा. सुजीत शेख यांनी सूत्रसंचालन केले.

अडचण होत आहे असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्षे वयाचा हा वटवृक्ष शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपणासाठी हलवला. लांब ट्रकमधून साताऱ्याला गोळीबार मैदान, म्हसवे येथे नेऊन पुनर्रोपण केले. त्याला जीवदान मिळून पालवी फुटली आहे. - सयाजी शिंदे, सह्याद्री देवराई संस्थेचे संस्थापक

टॅग्स :Satara areaसातारा परिसर