शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

उरमोडीचे पाणी शेवटपर्यंत पोहोचवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 23:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : ‘उरमोडीचे पाणी रात्रंदिवस प्रयत्न करून मोठ्या परिश्रमाने माण तालुक्यात आणलयं. ज्यांना या मातीचे काही देणेघेणे नाही, अशा औलादी कितीही केकाटल्या तरी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत उरमोडीचे पाणी पोहोचविण्याचा माझा संकल्प मी पूर्ण करणारच,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सरकार कुणाचेही असले तरी जिहेकटापूर उपसासिंचन ...

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : ‘उरमोडीचे पाणी रात्रंदिवस प्रयत्न करून मोठ्या परिश्रमाने माण तालुक्यात आणलयं. ज्यांना या मातीचे काही देणेघेणे नाही, अशा औलादी कितीही केकाटल्या तरी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत उरमोडीचे पाणी पोहोचविण्याचा माझा संकल्प मी पूर्ण करणारच,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सरकार कुणाचेही असले तरी जिहेकटापूर उपसासिंचन योजना पूर्ण करण्याचे मीशन आता हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.धामणी येथे पहिल्यांदाच आलेल्या उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी शिक्षण सभापती भास्करकाका गुंडगे, काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष एम. के. भोसले, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, दादासाहेब काळे, हरिभाऊ जगदाळे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, बाळासाहेब माने, गुलाबराव खाडे, सरपंच सिंधूताई खाडे, दिगंबर राजगे, बाळासाहेब पिसे, अजित खाडे, सय्यद मुलाणी आणि परिसरातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार गोरे पुढे म्हणाले, ‘आजपर्यंत माण तालुक्यातील अनेक पिढ्यांनी पाण्याची वाट पाहिली. गेल्या कित्येक वर्षांत जनतेने सक्षम लोकप्रतिनिधी न निवडल्याने आपल्या हक्काच्या पाण्यापासून आपण वंचित राहिलो. अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी फक्त लाचारी करून स्वत:चा स्वार्थ साधला. माणमधे पाणी आणण्यासाठी लागणारे प्रयत्न केले नाहीत. मी राजकारणात येताना माण तालुक्यात पाणी आणण्याचे स्वप्न पाहिले. पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बेभान होऊन रात्रंदिवस परिश्रम केले. दिलेल्या शब्दाप्रमाणे मी मतदारसंघात अनेक वेळा उरमोडीचे पाणी आणले.’विरोधकांनी प्रत्येक वेळी केकाटायचे काम केले. आत्ताही १६ दिवस माणमधे पाणी सुरू आहे. मात्र, एकाचेही या पाण्याकडे बघण्याचे धाडस झाले नाही. त्यांच्याकडे तशी नैतिकताच नाही. जनतेच्या आशीवार्दाने मी आपल्या हक्काचे पाणी यापुढेही कायम आणणार आहे. आलेल्या पाण्याला कोणता पक्ष किंवा पार्टी नाही. हे पाणी आपल्या सर्वांचे भले करणार आहे. उगाच या पाण्याला आणि इथल्या मातीला बदनाम करण्याचे उद्योग विरोधकांनी प्रयत्न करू नयेत. पाणी मीच आणलेय, आता बारसे घालायला कुणीही आले तरी फरक पडणार नाही. पाणी आणण्यासाठी युती सरकारशी संघर्ष करून त्यांना अनेक निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. आता उरमोडीचे पाणी दिवड, गट्टेवाडी, ढाकणी तलाव, वडजल भागात नेणार आहे. पुढच्या वर्षी जांभुळणीला जाणार आहे,’ असेही गोरे यावेळी म्हणाले.शासनाला दुष्काळावर खर्च करण्यापेक्षा पाणीयोजना चालविण्यासाठी खर्च करण्यासाठी गळ घालणार आहे. जिहेकटापूरसाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही योजनांचे पाणी यायला लागल्यावर माण तालुक्यातही साखर कारखाने उभे राहतील. कार्यक्रमात एम. के. भोसले, दिगंबर राजगे, सयाजी लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले.