शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडी, टेंभू, जिहे-कठापूर योजनांना गती देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:34 IST

मुंबई बंगळुरू काॅरिडोरमधून म्हसवडला एमआयडीसी करायची आहे. त्याबाबतच्या मान्यता पूर्णत्वाला गेल्या आहेत

कऱ्हाड : ‘सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी देणाऱ्या उरमोडी, टेंभू, जिहे-कठापूर या प्रकल्पांच्या कामाचा आढावा गुरुवारी अधिकाऱ्यांकडून घेतला आहे. या कामाला गती देण्यासाठी फेर प्रशासकीय मान्यता घेऊन त्यांना निधी देण्यासंदर्भात आम्ही निर्णय घेतले आहेत. लवकरच त्याबाबत कार्यवाही होईल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कऱ्हाड दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, ॲड. भरत पाटील, आदींची उपस्थिती होती.तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आषाढीला पंढरपूरला येणार आहेत? याबाबत विचारले असता, ‘मला हे तुमच्याकडूनच कळतंय असे सांगत फडणवीस म्हणाले, ‘पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. येथे सगळेजण येऊ शकतात. फक्त ज्यांना यायचं आहे त्यांनी भक्तिभावाने जरूर यावे. पण राजकारणासाठी येऊ नये असे मला वाटते, असे ते म्हणाले. चंद्रशेखर राव यांना तुम्हाला शह देण्यासाठी बोलवले जात आहे? असे विचारताच ‘तुम्हाला असलेच विषय बातमीसाठी लागतात,’ असे म्हणत त्यांनी स्मितहास्य केले.मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे? याबाबत विचारताच रखडलाय कुठे? असा प्रतिप्रश्न करत लवकरच विस्तार होणार आहे, असे त्यांनी सांगितले.सातारा जिल्ह्यातील भाजपचे नेते उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बुधवारी झालेल्या वादाविषयी विचारले असता, अशा गोष्टी होत असतात, पण तिथे काही गंभीर घडले आहे, असे नाही. ते फारसे अडचणीचे नाही, असे ते म्हणाले.

जमिनीचे अधिग्रहण सुरू करणारमुंबई बंगळुरू काॅरिडोरमधून म्हसवडला एमआयडीसी करायची आहे. त्याबाबतच्या मान्यता पूर्णत्वाला गेल्या आहेत. त्याचाही आढावा गुरुवारी शासकीय अधिकाऱ्याकडून घेतला. लवकरच आम्ही जमीन अधिग्रहण सुरू करणार असल्याचेही फडणवीस यांनी या वेळेला सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस