सातारा : राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, एसटी महामंडळ या नामफलकाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे महासचिव एन. बी. कुरणे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण झाले. यावेळी राजेंद्र राठोड, किरण वाघ, नासीर पठाण, प्रशांत मोहिते, ज्ञानोबा सूर्यवंशी, अमोल बनसोडे, अविनाश शिंदे, संजय नितनवरे, मोहन शिर्के, रफिक मुलाणी, वैभव गवळी आदी उपस्थित होते.
कुरणे म्हणाले, ‘कामगारांच्या हिताचे काम राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी महासंघ करीत आहे. संघर्षातून जो कर्मचारी वर्ग बुध्दीजीवी झाला आहे. त्यांनाच भारतात प्रस्थापित असलेल्या ट्रेड युनियन अंतर्गत संपविण्याचे काम सरकारमार्फत सुरू आहे.
फोटो दि. ०७सातारा बोर्ड फोटो...
फोटो ओळ : सातारा येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या नामफलकाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
...........................................................