शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वाई, जावळी तालुक्याला अवकाळीने झोडपले

By नितीन काळेल | Updated: April 22, 2024 19:01 IST

सर्वत्र पाणीच पाणी

सातारा : जिल्ह्यात पारा वाढत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. असे असतानाच सोमवारी दुपारनंतर वाई आणि जावळी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.एप्रिल महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात उन्हाळी झळा तीव्र झाल्या आहेत. सातारा शहरासह बहुतांशी भागातील कमाल तापमान हे ४० अंशादरम्यान राहत आहे. यामुळे दिवसा कडक उन्हाशी सामना करावा लागत आहे. तर रात्रीच्या सुमारास उकाड्याने बैचेन होण्याची वेळ आलेली आहे. तसेच कडाक्याच्या उन्हाने शेती, बाजारपेठेवरही मोठा परिणाम झालेला आहे. या उन्हापासून सुटका होण्यासाठी नागरिक दुपारच्या सुमारास घरी किंवा झाडाच्या सावलीत बसत आहेत. घराबाहेर जाणेही टाळले जात आहे. अशातच मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे हवेत गारवा निर्माण होत असल्याने लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे.सोमवारी तर दुपारी अडीचच्या सुमारास जावळी तालुक्यातील आनेवाडी परिसरात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच वाई तालुक्यातील विरमाडे, पाचवड या भागात पाऊस पडला. वाऱ्यासह हा पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. तर पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरुन धावणारी वाहने लाईट लाऊन जात होती. जवळपास १० मिनीटे पाऊस पडला. पण, यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. त्याचबरोबर वाई तालुक्यातील भुईंज परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच अन्य काही ठिकाणीही अवकाळी पाऊस झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस