शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांत चिंतेचे ढग, पिकांसह फळबागांना धोका 

By नितीन काळेल | Updated: January 9, 2024 12:19 IST

अजिंक्यतारा धुक्यात न्हाला..

सातारा : जिल्ह्यात अवकाळी ढग दाटले असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास सातारा शहरात पावसाने हजेरी लावली. तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणीही अवकाळी पाऊस पडला. यामुळे दाट धुके निर्माण झाले होते. या धुक्याचा व ढगाळ वातावरणाचा पिकांसह फळबागांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पारा घसरला आहे. किमान तापमान बहुतांशीवेळा १५ अंशाच्या खाली राहत आहे. परिणामी थंडीचा कडाका वाढल्याने ज्वारीसारख्या पिकावर चिकटा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. तसेच इतर पिकांच्या वाढीवरही परिणाम झालाय. असे असतानाच मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणही निर्माण होत होते. यामुळे अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज होता. हा अंदाज आता खरा ठरला असून सोमवारी सायंकाळपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे वातावरणातही चांगलाच बदल झाला आहे.सातारा शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरुपात पाऊस पडला असलातरी हवेत गारवा निर्माण झाला होता. तसेच या पावसामुळे माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्यांवर परिणाम झाला. तर सकाळपासून दुपारी १२ पर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झालेच नाही. त्याचबरोबर जिल्ह्याच्या अनेक भागातही हलक्या स्वरुपात अवकाळी पाऊस झाल्याचे दिसून आले.जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असतानाच ढगाळ वातावरण तयार होत आहे. तसेच दाट धुकेही पडत आहे. याचा फटका अधिक करुन द्राक्षे, डाळिंबसारख्या फळबागांना बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. कारण, दीड महिन्यांपूर्वी अवकाळी पाऊस होऊन बागांना मोठा फटका बसलेला. तशीच स्थिती आता निर्माण झालेली आहे. तर ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवरही धुके आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊ शकतो. यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अजिंक्यतारा धुक्यात न्हाला..सातारा शहराच्या बाजुलाच अजिंक्यतारा किल्ला आहे. मंगळवारी पहाटे शहर आणि परिसरात अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. यामुळे दाट धुकेही निर्माण झाले होते. पहाटेच्या सुमारास समोरील काही अंतरावरीलही दिसत नव्हते. तर अजिंक्यतारा किल्ल्यालाही धुक्याने वेढले होते. सकाळी आकरा वाजेपर्यंत किल्ल्यावर दाट धुके दिसून येत होते. त्यानंतर धुक्याची तीव्रता कमी होत गेली.

पुसेगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका पुसेगाव : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाच्या हलक्या सरीने पुसेगाव व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामातून ज्वारी, गहू यासारखा वर्षभरासाठी लागणारा पसा कुडता सांभाळताना शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे. तसेच वीट उत्पादन करणाऱ्या कामगारांना तसेच मालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपयांची उचल देऊन लातूर, नांदेड, बीड भागातून विटा थापण्यासाठी आलेले कामगारांची मोठी गोची झाली आहे. विटा पावसाने भिजल्याने मालकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस