शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मुंबई, पुण्यात होतं; मग साताऱ्यात का नाही?, महामार्गावरील उड्डाणपुलांची कचराकुंडी

By सचिन काकडे | Updated: July 12, 2023 12:37 IST

मुंबई, पुण्याच्या धर्तीवर साताऱ्यातील उड्डाणपुलांचे सुशोभीकरण केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गाच्या निर्मितीमुुळे साताऱ्याच्या विकासाची गाडी गतिमान झाली. परंतु महामार्गाच्या खालून गेलेल्या उड्डाणपुलांचा आजतागायत कधीही विकास झाला नाही. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपुलाचा कचरा झाला आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरातील उड्डाणपूल कात टाकत असतील तर सातारा शहरात हे का होऊ शकत नाही? असा सवाल सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

या ठिकाणी उड्डाणपूलशेंद्रे, खिंडवाडी, शिवराज पेट्रोल पंप, अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट, वाढे फाटा, लिंब खिंड

सध्या अशी आहे परिस्थिती

  • महामार्गाच्या दुतर्फा वसलेल्या गावांना जोडण्यासाठी लिंब खिंड ते शेंद्रे या मार्गावर एकूण सात उड्डाणपूल आहेत. एकेकाळी या उड्डाणपुलाखालील जागा प्रशस्त व मोकळी होती.
  • प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या जागेवर हळूहळू परप्रांतीय व्यावसायिक, टपरी चालक व छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी बस्तान बसविले. शिवाय अतिक्रमणही फोफावत चालले आहे.
  • अलीकडच्या काही वर्षांत उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेची अक्षरश: कचराकुंडी झाली असून, याचे कोणालाही सोयरसूतक नसल्याचे दिसते.

काय करता येईल..जिल्हा व पालिका प्रशासनाने प्रयत्न केल्यास महामार्गावरील सर्वच उड्डाणपूल कात टाकू शकतात. जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले, कास पठार, फुले आदींची चित्रे उड्डाणपुलाच्या भिंतीवर रेखाटता येऊ शकतात. वृद्धांसाठी ओपन जीम, उद्यान तसेच वाहनतळही विकसित करता येऊ शकते.

असे पालटले रूप..मुंबई महापालिकेकडून माटुंगा येथील उड्डाणपुलांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. उड्डाणपुुलांच्या पिलर्सवर पक्षी, निसर्ग, धबधबे व विविधरंगी फुलांची आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. सुशोभीकरणामुळे उड्डाणपूल प्रेक्षणीय स्थळ झाले आहे. पुण्यातील चांदणी चौकातील भुयारी मार्गातही असाच प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण, जिल्हा व पालिका प्रशासनाने मुंबई, पुण्याच्या धर्तीवर साताऱ्यातील उड्डाणपुलांचे सुशोभीकरण केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल.

सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करायलाच हवा. उड्डाणपुलांचे सुशोभीकरण झाले तर निश्चितच शहराच्या वैभवात भर पडेल. ही जागा अतिक्रमणांनी गिळंंकृत करण्यापूर्वी प्रशासनाने सुशोभीकरणाचे काम हाती घ्यायला हवे. - श्रीरंग काटेकर, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग