शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

परदेशी नागरिकांचा विनापरवाना पाहुणचार

By admin | Updated: January 13, 2016 22:14 IST

लॉजमालकावर गुन्हा : पाचगणीतील टॅक्सी युनियनच्या कार्यकर्त्यांची सतर्कता

पाचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील टॅक्सी युनियनच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने परदेशी नागरिकांना विनापरवाना बगंला भाड्याने देण्याचे कारणावरून पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, परदेशी पर्यटक पाचगणीत आल्यावर विविध हॉटेल्स व लॉजवर वास्तव्य करतात. पंरतु संबंधित हॉटेल व लॉजमालकांनी पर्यटकांची माहिती २४ तासांच्या आत देणे गरजेचे असते. परदेशी पाहुण्यांची आॅनलाइन नोंदणी करून संबंधित कार्यालयाकडे तसेच पाचगणी पोलीस ठाण्यात नोंदी करणे आवश्यक असते. पंरतु ‘ग्रीनपार्क लॉजिंग’चे (न्याहारी-निवास योजना) चालक रईस अहमद शेख (वय ५२, रा. बागडे रोड पाचगणी) यांनी लॉजमध्ये दोन परदेशी विद्यार्थी वास्तव्यासाठी ठेवले होते. रशियाचे नागरिक असणारे हे दोघेजण बिनाधास्तपणे सातारा पासिंगची दुचाकी घेऊन फिरत असल्याचे टॅक्सी युनियनच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. कार्यकर्त्यांनी ते कुठे उतरले आहेत, याची माहिती घेतली. संबंधितांना गाडीविषयी विचारले असता, ‘आम्हाला ती लॉजमालकाने भाड्याने दिली,’ असे त्यांनी सांगितले. त्यामुळे टॅक्सी युनियनच्या कार्यकर्त्यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात धाव घेतली व ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना दिली. शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी लॉजमालक रईस अहमद शेख याच्यावर विदेशी नागरिक कायद्याच्या (१९४६) कलम १४ अन्वये पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बाळासाहेब भरणे तपास करीत आहेत. (वार्ताहर) सूचना देऊनही उल्लंघन पाचगणी पोलिसांनी अशा गुन्ह्यांवर नजर ठेवली असून याबाबत सर्व शाळामालक, होस्टेल्स, लॉजमालक, हॉटेलमालकांना या कायद्याची माहिती दिली आहे. परंतु काहीजण याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. टॅक्सी युनियनच्या कार्यकर्त्यांनी ही सतर्कता दाखवली.