शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीनगरमधील कंपनीच्या खत, औषधांची बिगर परवाना विक्री, साताऱ्यात पर्दाफाश; वर्षभर पाळत ठेवून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:45 IST

दोघांवर गुन्हा नोंद, कृषी विभागाची कारवाई

सातारा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका खत उत्पादक कंपनीच्या औषधे आणि खताची साताऱ्यात विना परवाना विक्री करून बिलही न देणाऱ्यांचा कृषी विभागाने पर्दाफाश केला. तसेच या घटनेत १ लाख २३ हजार ४९० रुपये किमतीचा मालही जप्त करण्यात आला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार आणि कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणात कडू एकनाथ अधाने (रा. पिंपळगाव दिलवशी कॅंन्टोमेन्ट, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि गणेश चंद्रभान साळुंखे (रा. रायपूर, ता. देवगाव सैनिक शाळेजवळ, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.सोमवार, दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संजय फडतरे यांना गोपनीय सूत्रांकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ‘जीएस ॲग्रो‘ या खत उत्पादक कंपनीची खते व औषधे विक्रीसाठी सातारा जिल्ह्यातील शिवथर, तडवळे, सातारा, रहिमतपूर आणि पुसेगाव या ठिकाणी येणार असल्याचे समजले . यानंतर जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, गुण नियंत्रणचे कृषी अधिकारी युवराज काटे आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यातील अजिंठा चौकात सापळा रचला. दुपारनंतर गाडी (एमएच. २०, बीसी. ८१५८) आली. त्यामध्ये ‘जीएस’ ॲग्रो या कंपनीची खते व औषधे आल्याचे समजले. बनावट ग्राहक पाठवून खात्री केली तसेच तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारची खते व औषधे असा एकूण रुपये १ लाख २३ हजार ४९० रुपये किमतीचा साठा अधिकाऱ्यांना आढळला . तो जप्त करण्यात आला. तक्रारीनंतर सातारा शहर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

वर्षभर पाळत ठेवून कारवाई..छत्रपती संभाजीनगरमधील या कंपनीची शेतीविषयक खते आणि रासायनिक औषधांची विक्री सातारा जिल्ह्यात मागील एक ते दीड वर्षांपासून विना परवाना विक्री सुरू असल्याचीही माहिती कृषी विभागाकडे होती. पण, संबंधित जाळ्यात अडकत नव्हते. मात्र, सोमवारी कृषी विभागाला गोपनियरित्या माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली.

औषधे तपासणीसाठी..कृषी विभागाने जप्त केलेली औषधे आणि खतांबद्दल कृषी विभागाला संशय आहे. त्यामुळे विभागाने या साठ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तपासणीनंतरच खते आणि औषधे बोगस की प्रमाणित हे समजणार आहे.