शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सातारा जिल्ह्यातील आठपैकी चार बाजार समित्यांवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

By दीपक देशमुख | Updated: May 1, 2023 19:18 IST

सातारा जिल्ह्यातील नऊ पैकी आठ बाजार समिती यांचा निकाल लागला.

सातारा: जिल्ह्यातील नऊ पैकी आठ बाजार समिती यांचा निकाल लागला यामध्ये वाई, फलटण, कोरेगाव, लोणंद येथे राष्ट्रवादीने तर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कऱ्हाड बाजार समितीत काँग्रेस पुरस्कृत रयतने बाजी मारली. सातारा बाजार समितीत भाजपने एकहाती यश मिळवले. पाटणला शंभूराज देसाई यांनी सत्तांतर घडवत बाजार समिती ताब्यात घेतली. 

कराडमध्ये रयतला पुन्हा सत्ताकराड बाजार समितीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील यांच्या रयत पॅनेलने  बाजी मारली असून सत्ता कायम ठेवली आहे. रयत पॅनेलने १२ जागा जिंकल्या तर शेतकरी पॅनेलला ६ जागांवर समाधान मानावे लागले.

सातारा बाजार समितीत शिवेंद्रराजेच अजिंक्यसातारा बाजार समितीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनलने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा सुफडा साफ करत सर्व  १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी यांनी पाठींबा देऊनही स्वाभिमानी पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. 

पाटण बाजार समितीत सत्तांतरकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पहिल्यांदाच ऐतिहासिक सत्तांतर घडवत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई गटाने येथे १८ पैकी तब्बल १५ जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

फलटण बाजार समितीत राजेगटाचेच वर्चस्व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीवर विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार  रामराजे नाईक निंबाळकर यांचाच करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्रीराम पॅनल मध्ये असलेल्या सर्व 14 उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. विरोधी गटाचे पूर्ण पॅनल सुद्धा तयार झाले नव्हते, परंतु लढलेल्या काही उमेदवारांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले.

वडूजला सर्वपक्षीय पॅनलची सत्तावडुज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खटाव तालुका विकास आघाडीचे १३ उमेदवार विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी सहकार पँनेल ला ५ जागेवरच समाधान मानावे लागले.

वाई बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडावाई बाजार समितीत राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार प्रगती पॅनेलचे अकरा उमेदवार सरासरी ५०० पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले तर यापूर्वीच सहा बिनविरोध झाल्या आहेत. विरोधी दीपक ननावरे व विकास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी परिवर्तनपॅनल ला आर्थिक दुर्बलची एक जागा मिळाली.

कोरेगाव समितीवर घड्याळाचा गजरसंपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकारी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवत आपला झेंडा बाजार समितीवर रोवला आहे. विरोधी कोरेगाव तालुका विकास आघाडीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले असून अपक्ष उमेदवाराने एका ठिकाणी विजय मिळवला आहे.

लोणंद समितीवर राष्ट्रवादीचा झेंडालोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने १७ जागा  जिंकल्या. भाजपा सेना युती पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलने१ जागा मिळवली. 

टॅग्स :satara-pcसाताराNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा