शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

कराडात ऊस दर संघर्ष समितिची पायी दिंडी, शेतकरी संघटना एकवटल्या 

By प्रमोद सुकरे | Updated: November 13, 2022 12:09 IST

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सहकाराचा पाया रोवला. शेतकऱ्यांचे जीवनात आर्थिक उन्नती यावी शेतकरी सुखी व्हावा समाधानी व्हावा यासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखान्याची निर्मिती केली.

कराड : सातारा जिल्ह्यामधील कारखान्यांनी उसाची पहिली उचल ३५०० रुपये द्यावी यासाठी कोपर्डी हवेली येथे पहिली ऊस परिषद पार पडली. यावेळी ऊस परिषदेमध्ये आंदोलनाचे टप्पे शेतकऱ्यांनी ठरवले होते. त्यानुसार सोमवारी दि.१४ रोजी कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथ देवाचे दर्शन घेऊन बनवडी फाटा, कृष्णा कॅनॉल, मंगळवार पेठ कराड ते यशवंतराव चव्हाण  समाधीस्थळ प्रीतीसंगम अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पायी दिंडी काढण्याचे ठरले होते.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सहकाराचा पाया रोवला. शेतकऱ्यांचे जीवनात आर्थिक उन्नती यावी शेतकरी सुखी व्हावा समाधानी व्हावा यासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखान्याची निर्मिती केली. परंतु आत्ताचे साखर सम्राट हे साखर कारखान्याचे मालक असल्यासारखे वागत आहेत. शेतकऱ्यांना विचारात घेऊन त्यांच्या उसाला योग्य भाव द्यावा तसेच शेजारील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन आपला पहिला हप्ता ३०००च्या पुढे जाहीर करत आहेत. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला सर्व शेतकरी यावेळी नमन करून  त्यांचे नाव घेऊन राजकारण, समाजकारण करणाऱ्या तुमच्या कर्मभूमीतील साखर कारखानदारांना सुबुद्धी द्यावी, असं साकडं ऊस दर संघर्ष समिती व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने घालण्यात येणार आहे

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावेमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्यातील आहेत. ते स्वतः शेतकरी असून त्यांना शेतकऱ्यांबद्दल अस्ता आहे .हे वारंवार दिसूनही आलेले आहे. आमची त्यांना विनंती आहे आपण जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांच्या पहिल्या उचलीचा तिढा लवकरात लवकर सोडवावा .ऊस दर प्रश्न लवकरात लवकर बैठकीचे नियोजन करण्यात यावं असे आव्हान ऊसदर संघर्षाची वतीने सचिन नलवड़े यांनी केले आहे.

जाहिररित्या बोलावे...शेजारील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कारखाने एक रकमी ३२००च्या आसपास दर देत आहेत. त्यांची रिकवरी ही आपल्या कारखान्या एवढीच आहे मग आपले कारखाने पहिला हप्ता ३००० च्या पुढे का देऊ शकत नाहीत? याचं कारण त्यांनी जाहीर रित्या सांगावे.  उपपदार्थाचा हिशोब आपण का दिला नाही हेही जाहीर रित्या सांगावे असे आव्हान ऊस दर संघर्षित समितीच्या वतीने विश्वास जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने