शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

पडिक जमीन आली लागवडीखाली

By admin | Updated: May 25, 2014 00:33 IST

एकात्मिक पाणलोट विकास : परळी खोर्‍यात जमीन सपाटीकरण

सातारा : एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत सातारा तालुका कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जमीन सपाटीकरण व बांध बंदिस्तीमुळे परळी खोर्‍यातील डोंगराळ तसेच खडकाळ भागातील ३५० एकर पडिक जमीन लागवडीखाली आली आहे. परिणामी या दुर्गम भागातील शेतकर्‍यांच्या आर्थिक परिवर्तनाचा मार्ग सुकर झाला आहे. आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांच्या प्रयत्नामुळे आणि कृषी विभागाच्या धोरणामुळे ही जमीन ओलिताखाली आली आहे. सातारा तालुक्यातील परळी विभागात एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत ५५, ५६, ५७ व ५८ या ४ क्लस्टरचा समावेश झाला आहे. आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी शासन पातळीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे पाणलोट विकास कार्यक्रमासाठी सातारा तालुक्याला पाच वर्षांसाठी २६ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या वर्षासाठी चार कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पंचायत समिती सदस्य कविता चव्हाण, पंचायत समिती सदस्य सोमनाथ पवार यांनी कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकर्‍यांशी समन्वय साधून कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी योग्यरीत्या नियोजन केले. परळी विभागातील क्लस्टर क्रमांक ५६ मध्ये नित्रळ, निगुडमाळ-ताकवली, केळवली-सांडवली, कातवडी बुद्रुक, खडगाव, पळसावडे, कुस खुर्द, कुस बुद्रुक, कासारस्थळ, यादववाडी, बनघर, पांगारे आणि परळी अशी १३ पाणलोट समित्यांची स्थापना करण्यात आली. सातारा तालुक्यातील प्रत्येक विभागात पाणलोट समित्यांची स्थापना करण्यात येऊन ठिकठिकाणी पाणलोटाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी माथा ते पायथा अशी कामाची आखणी करण्यात आली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ओघळ नियंत्रणमध्ये लुजबोल्डर, अर्दन स्ट्रक्चर तर दुसर्‍या टप्प्यामध्ये समतल चर व तिसर्‍या टप्प्यात माती नालाबंध, सपाटीकरण या कामांचे नियोजन करण्यात आले. सपाट जमीन व बांध बंदिस्ती झाल्यामुळे डोंगर उतारावरून वाहून जाणारे तसेच पडणार्‍या पावसाचे पाणी जमिनीतच मुरण्यास मदत होणार आहे. यापूर्वी जमीन उतारावर फक्त नाचणीचे पीक घेण्यात येत होते आणि याठिकाणी जमिनीचे सपाटीकरण झाल्याने भात पीक मोठ्या प्रमाणात घेता येणार आहे. पीक उत्पादनात हमखास वाढ होणार असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक पातळी उंचविण्यास मदत होणार आहे. पाणलोट विकासाची योजना प्रभावीपणे मार्गी लागल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. शासनाच्या धोरणानुसार कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविला आहे. (प्रतिनिधी)