कालगांव (ता. कऱ्हाड) येथे विकास सेवा सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने आयोजित सभेत ते बोलत होते. पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, उपसरपंच महेश चव्हाण, आनंदराव चव्हाण, माजी सरपंच डॉ. शंकरराव पवार, राजेंद्र सरनोबत, जयवंतराव चव्हाण, शिवाजीराव शिंदे, माजी अध्यक्ष अनिल चव्हाण, आप्पा घोलप व सोसायटीचे संचालक उपस्थित होते.
डॉ. शंकरराव पवार म्हणाले, उंडाळकरांचे विचार दूरदृष्टीचे आणि काँग्रेस पक्षाला पुढे नेणारे होते. त्यांनी कोयना दूध संघ, खरेदी-विक्री संघ, रयत कारखाना उभा केला. तसेच जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना जिल्हा बँकेत संधी देऊन स्वावलंबी बनविले.
रमेश चव्हाण, आनंदराव चव्हाण, महेश चव्हाण, आदींनी दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कार्याची माहिती विषद केली. संचालक अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. युन्नूस मुल्ला यांनी आभार मानले.