शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
2
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
3
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
4
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
5
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
6
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
7
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
8
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
9
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
10
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
11
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
12
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
13
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
14
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
15
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
16
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
17
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
18
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
19
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
20
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

शिवीगाळवरून वाद : फलटणमध्ये सासऱ्याकडून सुनेचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 2:19 PM

फलटण : जेवताना शिवीगाळ केल्याच्या वादातून जाधववाडी, ता. फलटण येथे सासऱ्याने सुनेचा चाकूने वार करुन निर्घृण खून केल्याची खळबळजनक ...

ठळक मुद्देफलटणमध्ये सासऱ्याकडून सुनेचा निर्घृण खूनशिवीगाळवरून वाद विकोपाला : मारहाणीत सासराही गंभीर जखमी

फलटण : जेवताना शिवीगाळ केल्याच्या वादातून जाधववाडी, ता. फलटण येथे सासऱ्याने सुनेचा चाकूने वार करुन निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी सासऱ्यालाही बेदम मारहाण केली. जखमी सासऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आम्रपाली शाम पवार (वय २३, रा. जाधववाडी, ता. फलटण) असे खून झालेल्या सुनेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण शहराशेजारी जाधववाडी येथे पवार कुटुंबीय वास्तव्यास आहे. रविवारी रात्री आम्रपाली पवार हिला सासरा चांडवल झबझब पवार (वय ५०) याने शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की, आम्रपाली आणि अन्य नातेवाईकांनी सासरा चांडवल पवार याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर चिडलेल्या चांडवल याने आम्रपालीच्या मानेवर चाकूने सपासप वार करून तिचा निर्घृण खून केला. नातेवाईकांच्या मारहाणीमध्ये चांडवल सुद्धा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर फलटण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी कविता चांडवल पवार (वय ४५) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी चांडवल पवारवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सासरा चांडवल याला मारहाण केल्याप्रकरणी आम्रपालीच्या नातेवाईकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण हे करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर