शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उदयनराजेंनी घेतली भेट, राष्ट्रपतींनी दिलं 'हे' आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:30 IST

मुर्मू यांची या पदावर निवड करून भारताने नवीन इतिहास रचला.

सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन महिलांचा सन्मान करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या ऐतिहासिक सातारानगरीला मी आवश्य भेट देईन,’ असे आश्वासन नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिले. द्रौपदी मुर्मूजी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन त्यांचे गौरव केले. यावेळी त्या बोलत होत्या.खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारताच्या राष्ट्रपतिपदी प्रथमच आदिवासी महिला म्हणून द्रौपदी मुर्मूजी यांची निवड झाली. भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार महामहिम द्रौपदी मुर्मूजी यांची प्रचंड मताधिक्यांनी निवड झाली. मुर्मू यांची या पदावर निवड करून भारताने नवीन इतिहास रचला.या भेटीत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे एक प्रतिक राजमुद्रा आणि पुष्पगुच्छ भेट देवून राष्ट्रपतींचा सन्मान केला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना साताऱ्याचा ऐतिहासिक तसेच सामाजिक वारसा सांगितला. छत्रपती शाहू महाराजांनी वसविलेल्या सातारानगरीत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपले सर्वस्वपणाला लावले होते. त्यांनी रयतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. महिलांच्या शिक्षणाची सोय साताऱ्यात निर्माण केली. अशा या ऐतिहासिक सातारानगरीला आवश्य भेट द्यावी अशी विनंती करून राष्ट्रपतीनां निमत्रित केले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काही काळ ज्ञानदान केले आहे. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व चांगलेच माहीत आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे महत्व त्यांना माहीत आहे. त्यामुळे ज्या सातारच्या छत्रपती घराण्याने महिलांच्या शिक्षणाचा वारसा निर्माण केला अशा मराठा साम्राजाच्या राजधानीस मी आवश्य भेट देईन. तसेच सातारानगरीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सहकार्य देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPresidentराष्ट्राध्यक्षDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले