शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

साताऱ्याच्या मनोमिलनावर शिवेंद्रराजेंची मोहोर!, मुलाखतीनंतर उदयनराजे थेट ‘सुरुची’वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:59 IST

आम्ही दोघे भाजपमध्येच : निवडणूक पक्ष म्हणूनच लढविणार

सातारा : भारतीय जनता पार्टीने मोठी जबाबदारी आपल्यावर सोपविली आहे. त्यामुळे जिल्हा म्हणून पक्षाला ताकद देणे आपली जबाबदारी आहे. मी भाजपमध्ये आहे, उदयनराजेदेखील भाजपमध्ये आहेत. आम्ही भाजप म्हणूनच सातारा पालिकेची निवडणूक लढविणार आहोत, असे सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेतील मनोमिलनावर ‘मोहोर’ उमटविली. नगराध्यक्ष व उमेदवार निवडीचा फैसला पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.भाजपच्या वतीने सोमवारी सातारा पालिकेसाठी नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रत्येकाचे काम तोलामोलाचे आहे. भाजपची उमेदवारी मिळावी, अशी अनेकांची मागणी आहे. मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली की, पुढील टप्प्यात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित केला जाईल. जिल्ह्यात बहुतांश पालिकांमध्ये मुलाखतीची प्रकिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे उमेदवारांची नावे असलेली संक्षिप्त यादी मंगळवारी मुंबईत आयोजित पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांकडे सादर केली जाईल.साताऱ्याचा भावी नगराध्यक्ष कोण असणार, याबाबत छेडले असता ते म्हणाले, ‘जो योग्य आहे, ज्याची प्रतिमा चांगली असेल, ज्याची प्रशासनावर पकड असेल, ज्या व्यक्तीची जनमानसात ओळख आहे, असाच व्यक्ती नगराध्यक्ष म्हणून निवडला जाईल. नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही आघाड्यांत तसेच मूळ भाजपमधील इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवार निवडीबाबत पक्षश्रेष्ठींकडूनच निर्णय घेतला जाईल.कराडात भाजपचाच नगराध्यक्षकराडात शिंदेसेनेकडून राजेंद्र यादव यांची नगराध्यक्षपदासाठी निवड जाहीर करण्यात आली. याबाबत माध्यमांनी छेडले असता ते म्हणाले, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपण महायुतीत आहोत याचे सर्वांनी भान ठेवावे, असे सांगितले होते. यावर आम्ही जो काही पाटणमध्ये महायुती म्हणून निर्णय होईल, तोच जिल्ह्यात इतरत्र होईल, असे स्पष्ट केले होते. कराडात अतुल भोसले भाजपचे आमदार आहेत. या पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष होईल आणि पालिका भाजपच्या विचाराची होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.उदयनराजे ‘सुरुची’वरभाजपने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सायंकाळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची ‘सुरुची’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा तपशील समोर आला नसला तरी जागावाटपाबाबत दोन्ही राजेंमध्ये गुफ्तगू झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shivendraraje Seals Alliance: Udayanraje Visits After Interview for Satara Municipal Election

Web Summary : Shivendraraje Bhosale confirmed BJP will contest Satara Municipal elections together. Party leaders will decide on mayoral candidate. He expressed confidence BJP's candidate will be Karad's mayor. Udayanraje Bhosale met Shivendraraje, sparking seat-sharing discussions.